शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

आज लाईफ चेंजिंग सेमिनारचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:53 IST

लोकमत कॅम्पस क्लब आणि अभिजात ट्यूटोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे हा सेमिनार सांयकाळी ५ त ८ या वेळेत स्वयंवर मंगल कार्यालयात होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकमत कॅम्पस क्लब आणि अभिजात ट्यूटोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेमिनार सांयकाळी ५ त ८ या वेळेत स्वयंवर मंगल कार्यालयात होईल. या सेमिनारमध्ये पुणे येथील गुरू फाऊंडेशनचे शिक्षणतज्ज्ञ दीपक जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत.हा सेमिनार विद्यार्थी व पालकांसाठी निशुल्क राहणार आहे. या सेमिनारमध्ये विद्यार्थांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यात मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त कसे करावे, केलेला अभ्यास जास्तीत -जास्त स्मरणात कसा राहिल याच्या टिप्स देण्यात येणार आहेत.रविवारच्या सेमिनार नंतर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ ते ८ जून दरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा भाग्यनगर येथील अभिजात ट्युटोरीलय येथे आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेतून मुलांना अभ्यास मजेशीर वाटणे, अभ्यास लक्षात ठेवणे, कुठल्याही विषयात १०० टक्के रुची असणे, परीक्षेची भीती नाहीशी होणे, अगदी सहज लक्षात ठेवणे, स्मरणशक्तीमध्ये वाढ होवून परीक्षेतील चुका कशा टाळाव्यात, कल्पना शक्ती वाढविण्याच्या टिप्स, गणितीय सूत्र लक्षात ठेवणे यासह अनेक गोष्टी या कार्यशाळेतुन शिकता येणार आहेत. रविवारी होणाºया सेमिनारला जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.कार्यशाळेसाठी कॅम्पस क्लब सदस्यांना प्रवेश मोफत असून सदस्यांना ओळखपत्र आवश्यक आहे. नाव नोंदणीकरिता ९९७०२३९१०३, ९७३००२००६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रlokmat campus clubलोकमत कॅम्पस क्लब