शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

इंटरपॉइंट स्थलांतरास शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:48 IST

सर्वपक्षीय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिका-यांना इंटरपॉइंट स्थलांतरित न करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजामवाडी : नागपूर - समृद्धी हायवेवर जालना शहरालगत जामवाडी, गुंडेवाडी व तांदुळवाडी शिवारात इंटरचेंज पॉइंट प्रस्तावित करण्यात आलेले आहे. परंतू, महाराष्ट्र राज्य विकास महामंडळातील काही वरिष्ठ अधिकारी, नेते मंडळी हा इंटरचेंज पॉइंट हलवून निधोना किंवा खादगाव येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत सर्वपक्षीय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिका-यांना इंटरपॉइंट स्थलांतरित न करण्याबाबत निवेदन देण्यात आले.याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी ३० डिसेंबर २०१६ व ८ मार्च २०१७ रोजी दोन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या अधिसुचनेनुसार जामवाडी शिवारातील १.९७ हेक्टर गुंडेवाडी शिवारातील ६५.८० हेक्टर जमीन तांदूळवाडी शिवारातील ६. ९८ हेक्टर व जालना शिवारातील ६. ७३ हेक्टर जमीन इंटरजेंच पॉर्इंट अधिसूचित करण्यात आलेली आहे.अधिसूचित करण्यात आलेला इंटरचेंज पॉइंट शहरातील काही उद्योजक , संबंधित खात्यातील अधिकारी स्वत:च्या फायद्यासाठी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.निधोना व खादगाव येथील जमीनीचा शासकीय दर ८० ते ९६ लक्ष रूपये एकर असून, जामवाडी, गुंडेवाडी व तांदूळवाडी जमिनीचा शासकीय दर ३० ते ६० लक्ष रूपये प्रति एकर आहे. इंटरचेंजसाठी बहुतेक जिरायत जमीन अधिसूचित करण्यात आलेली आहे. बहुतांश जमीनीला ३० लक्ष रूपये प्रति एकर भाव द्यावा लागेल तर निधोना व खादगाव येथे ८० ते ९६ लक्ष रूपये भाव द्यावा लागेल. त्यामुळे शासनाचे १०० कोटींचे नुकसान होऊ शकते. असे निवेदनात म्हटले आहे.हा इंटरचेंज पॉइंट जेथे प्रस्तावित आहे तेथेच ठेवावा. तो स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न केल्यास जामवाडी, गुंडेवाडी, तांदुळवाडी गावातील २०० शेतकरी सामुहिक आत्मदहन करतील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर सर्वपक्षीय शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण गजर यांच्यासह शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत. हा प्रश्न प्रारंंभीपासून गाजत असून,याबाबत सर्वत्र मौन पाळले जात आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी