शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाक विधेयकास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:15 IST

तिहेरी तलाकवर बंदी घालणा-या विधेयकास विरोध दर्शवीत आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अंतर्गत ईस्लाहे ए- मुशरा जालना जिल्हा कमिटीच्या महिला शाखेतर्फे शनिवारी शहरात मोर्चा काढण्यात आला.

जालना : तिहेरी तलाकवर बंदी घालणा-या विधेयकास विरोध दर्शवीत आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अंतर्गत ईस्लाहे ए- मुशरा जालना जिल्हा कमिटीच्या महिला शाखेतर्फे शनिवारी शहरात मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद शाळेपासून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे जुना जालना ईदगाह मैदानावर सभेत रुपांतर झाले. या वेळी कमिटीच्या महिला पदाधिका-यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.केंद्र शासनाने तिहेरी तलाकवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे. यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडून विरोध होत असून, ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सकाळी जिल्हा परिषद शाळेपासून या मोर्चास सुरुवात झाली. बुरखा परिधान करून मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग झालेल्या महिलांनी हातात फलक घेऊन आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. गांधी चमन, शनि मंदिर, कचेरी रोड मार्गे जुना जालन्यातील ईदगाह मैदानावर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.यावेळी आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या औरंगाबाद येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या फइमुन्निसा बेगम यांनी आपल्या भाषणातून तीन तलाक संदर्भात केंद्र शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. त्या म्हणाल्या, की मुस्लिमांचा शरियत कायदा हा नीतीमूल्य हक्क अधिकाराला जपणारा आहे. खुदा आणि रसूल यांचा पवित्र कायदा आम्ही तोडू देणार नाही. इस्लाम धर्मात व्यक्ती शरियत कायद्यावर अंमलबजावणी करून लग्न आणि संसार करते तीच व्यक्ती ख-या अर्थाने बहादूर आहे. मुस्लिम समाजाने महिलांना त्यांचे वारसाहक्क हे शरियत कायद्यानुसार दिले गेले पाहिजेत. परंतु या गोष्टी सहजपणे होत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. मुस्लिम समाजात विवाह साध्या पद्धतीने करायला हवेत. मात्र, आज अन्य समाजांचे अनुकरण करीत मुस्लिम समाजही विवाहात बडेजावासाठी मोठा खर्च करीत आहे. हे इस्लामला मान्य नाही. जमियुतल मोहसीनात यास्मीन साहेबा व औरंगाबाद येथील शबाना आमी म्हणाल्या की, केंद्र शासनाने मूठभर महिलांचे म्हणणे ऐकून कोट्यवधी महिलांचा विश्वासघात करीत तिहेरी तलाक बंदी कायदा करण्याची घाई केली. शासनाने ताबडतोब त्यांचे पाऊल मागे घ्यावे, नसता देशभरामध्ये यापेक्षाही जास्त मोठे आंदोलन उभारण्यात येईल.जाहीर सभेच्या ठिकाणी मेहजबीन आणि अमीना आलमाश यांनी इंग्रजी आणि ऊर्दू भाषेत मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. तहसीलदार विपीन पाटील यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर यासमीन साहेबा, जमितुल मोसीनात, फहिमूलनिसा (जमाते ईस्लामी हिंद) , नगरसेविका खान रफिया वाजेद खान, खान रुबिना अमजद खान, फरीन अजहर, फरहाना अन्सारी, शबनम कमल खान, मेराज बाजी, समीना यास्मीन अब्दुल हाफीज, अतिया सलीम, अमीना मुजीब आदींच्या स्वाक्ष-या आहेत. यावेळी तहसीलदार विपीन पाटील यांनी निवेदन स्वीकारून मोर्चेक-यांच्या भावना शासनाला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले. अमिना अलमाश यांनी सूत्रसंचालन केले तर अ. रऊफ नदवी यांनी आभार मानले.---------------जिल्हा परिषद शाळेपासून सुुरुवात झालेल्या महिला मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी मुस्लिम महिला बुरखा परिधान करून होत्या. हातामध्ये विविध मागण्यांचे फलक झळकत होते. शिस्तबद्धता आणि शांततेत हा मोर्चा काढण्यात आला. कोणतीही घोषणाबाजी करण्यात आली नाही.---------------ना बदला है, ना बदलेगा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड खुदा और रसूल का कानून नही तोडा दिया जाऐगा, हम वक्त पडनेपर जान भी दे देंगे, अशा तीव्र भावना सहभागी महिलांनी सभेत व्यक्त केल्या. मोर्चासोबत बंदोबस्तासाठी महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होत्या.