शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनाच्या विकेंद्रीकरणातच स्वयंरोजगाराच्या संधी तयार होतात- देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:33 IST

उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले.येथील जेईएस महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित १५ व्या राज्यस्तरीय गांधीविचार अभ्यास शिबिरात स्वावलंबन आणि स्वयंरोजगार या विषयावर ‘त्या’ बोलत होत्या.पुढे बोलताना ‘त्या’ म्हणाल्या की, स्वयंरोजगारातून बनवलेल्या वस्तू सर्वांनी वापराव्या, जेणेकरून अनेकांना रोजगार मिळेल आणि संपत्तीचे केंद्रीकरण होणार नाही, विषमताही निर्माण होणार नाही. आज पन्नास टक्केपेक्षा अधिक संपत्ती काही निवडक लोकांच्या हातात आहे आणि त्याची वृद्धी काही पटीत होताना दिसते. यामुळे गरिबी, बेरोजगारीसारख्या समस्या वाढत आहे. आजची शिक्षण व्यवस्था तरुणांना निरुद्योगी व परावलंबी करणारी आहे, ज्यामुळे बेकारीचा प्रश्न समाजात निर्माण झाला आहे. त्यासाठी तरुणांनी स्वावलंबनातून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या नव्या समाजव्यवस्थेसाठी प्रयत्न करावेत. तरुणांनी समाज माध्यमांद्वारे विकास, प्रगती यांचे वरवरचे अर्थ समजून घेण्यापेक्षा वर्तमानपत्र व संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून ते नीट समजून घेतले पाहिजे.आपला विकास साध्य करताना आपल्या हातातून जाणाºया पैशाचा प्रवास विचारात घ्यावा. ज्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.भौतिक सुखामुळे माणूस आत्ममग्न होतो व नव्या स्मार्ट जगण्याच्या कल्पनांना बळी पडतो. त्यासाठी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा महात्मा गांधींचा मंत्र आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSocialसामाजिक