शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

उघड्यावरील खाद्यपदार्थ; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:39 IST

शहरात ठिकठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थ ठेवून त्याची विक्री सुरू असून, यामुळे जालनेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात ठिकठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थ ठेवून त्याची विक्री सुरू असून, यामुळे जालनेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, व्यावसायिकांना कारवाईची कसलीही भीती उरलेली नसतानाच हे अन्नपदार्थ खाणाऱ्यांनाही आपल्या आरोग्याची काळजी नसल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जालना शहरात विविध ठिकाणाहून नागरिकांचा सातत्याने राबता असतो. त्यामुळे मुख्य मार्गावरील तसेच बसस्थानक, शासकीय कार्यालय परिसरातील हॉटेल्समध्ये खाण्या-पिण्यासाठी सातत्याने वर्दळ दिसून येते.मात्र, ग्राहकांना खाण्यासाठी देण्यात येणारे हे अन्नपदार्थ सुरक्षितरीत्या झाकून ठेवण्याकडे व्यासायिकांचा कानाडोळा होत असल्याचे चित्र आहे. शिवाय, अनेक ठिकाणी हातगाड्यांवर अन्नपदार्थांची विक्री होत असून, याच्या आजूबाजूलाही कमालीची दुर्गंधी व घाण साचल्याचे चित्र आहे. त्यातच सध्या शहराच्या अनेक भागांत प्रशासनाच्या वतीने रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ होत आहे. उघड्या अन्नपदार्थांवर ही धूळ जात असल्यामुळे हे पदार्थ खाण्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.अन्न व औषध प्रशासनाकडून अधून-मधून अशा व्यावसायिकांवर कारवाईचा फार्स केला जात असला तरी याची फारशी भीती व्यावसायिकांमध्ये असल्याचे दिसून येत नाही.कारवाई झाली तरी नियमानुसार दंड भरून हे व्यावसायिक पुन्हा आपला व्यवसाय त्याच पध्दतीने सुरू ठेवतात. त्यामुळे या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे.सूचना : ग्राहकांनी काळजी घ्यावीअन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वर्षभरामध्ये हॉटेलमधील अन्नपदार्थ नमुन्यांची तपासणी करण्यात येऊन संबंधितांना सुधारणा नोटिसाही बजावण्यात आल्या. यापुढेही कारवाई चालूच राहील. परंतु, ग्राहकांनी देखील आपण खात असलेले अन्नपदार्थ झाकून ठेवलेले किंवा स्वच्छ आहेत की नाहीत, हे पाहणे गरजेचे असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. ई. देसाई यांनी सांगितले.८७ नमुन्यांची तपासणीअन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वर्षभरात जिल्ह्यातून वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे ८७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील ७४ नमुने प्रमाणित तर १ नमुना अप्रमाणित आढळून आला. तर तीन प्रकरणांमधील अहवाल अद्याप बाकी आहे. अप्रमाणित नमुन्यांबाबतचा अहवाल सहायक आयुक्तांकडे दाखल करण्यात आला असून, यात या व्यावसायिकांवर ठेवलेले आरोप सिध्द झाल्यास किरकोळ त्रुटींसाठी दहा लाखांपर्यंतचा दंड व गंभीर बाबीसाठी ६ महिने ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.३९ हॉटेल चालकांना नोटिसादरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ८० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ३९ हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्याचे सहायक आयुक्त देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागMarketबाजारHealthआरोग्य