शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चाळीचे अनुदान खर्च न करताच संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:39 IST

अनुदानपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न करता खर्च झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत यंदाच्या आर्थिक वर्षात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कांदा चाळ उभारणीची फाईल मंजुरीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांनी पूर्वसंमती देऊन फाईल मंजूर करण्यात आल्या होत्या. यासाठी लागणाऱ्या १ कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु, अनुदानपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न करता खर्च झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शेतक-यांच्या कांदा चाळ अनुदानाच्या १७१ फाईल कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळे तीनदा परत येऊन चौथ्यांदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने परिपूर्ण करून त्या मंजुरीसाठी जिल्हा कृषी कार्यालयाकडे पाठविल्या होत्या.आतापर्यंत जाफराबाद तालुक्यातील शेतक-यांना अनुदानाचा लाभ मिळाला नसून कृषी विभागाच्या मनमानी कारभारामुळे लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.शेतक-यांनी उसनवारीवर पैसे जमा करून कांदाचाळ उभी केली आहे. यामुळे खर्च केलेले पैसे मार्च अखेरीस मिळतात की नाही, याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे शेतक-यांचा अनुदान निधी कुठे खर्च झाला, याची माहिती लाभार्थ्यांना देणे आवश्यक आहे. तसेच हा निधी इतरत्र तर वळविला तर नाही ना अशी चर्चा सुरू आहे.तालुका कृषी कार्यालय आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्यात फाईल पाठविण्याचा सारीपाटाचा खेळ डिसेंबरपासून सुरू आहे. मागील तीन महिन्यांपासून शासनाच्या नियमानुसार मापन पुस्तिका, अंदाजपत्रका नुसार कांदा चाळचे प्रस्ताव तयार करून पात्र लाभार्थ्यांना जवळपास १ लाख ७५ हजार रुपये खर्च करून प्रस्ताव उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांना पाठवून देण्यात आले आहे. त्या वेळची तांत्रिक कारणे आणि आता आर्थिक तरतुदीचे कारण पुढे करण्यात येत आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी