शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ब्लास्टिंग ट्रॅक्टरच्या स्फोटात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:56 IST

रस्त्याच्या कडेला उभारलेल्या ब्लास्टिंग ट्रॅक्टरमधील जिलेटिनच्या कांड्यांचा अचानक स्फोट झाल्याने गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेश लिंगसे या ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : रस्त्याच्या कडेला उभारलेल्या ब्लास्टिंग ट्रॅक्टरमधील जिलेटिनच्या कांड्यांचा अचानक स्फोट झाल्याने गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेश लिंगसे या ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. इतर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना घनसावंगी तालुक्यातील लिंगसेवाडी शिवारात सोमवारी रात्री घडली.गोदाकाटवर असणाऱ्या लिंगसेवाडी येथील शेतकरी नारायण पवार यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू आहे.या विहिरीच्या कामासाठी गेवराई तालुक्यातील रुईचीवाडी येथील लक्ष्मण लाड यांचे ब्लास्टिंगचे ट्रॅक्टर (क्र. एम.एच. १७- ए.व्ही. ६१३७) सोमवारीगावावर शोककळाट्रॅक्टरच्या स्फोटात मयत झालेला ऋषिकेश हा गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीत शिक्षण घेत होता. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. मयत मुलाच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री आले होते. या विहिरीतील ब्लास्टिंगचे काम करून ट्रॅक्टर घेऊन चालक रस्त्यावर आला. हे ट्रॅक्टर परमेश्वर लिंगसे यांच्या शेताजवळ उभा करून चालक इतर कामासाठी बाजूला गेला. त्याचवेळी अचानक या ट्रॅक्टरमध्ये असणाºया जिलेटिनचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्या ट्रॅक्टरचे तुकडे झाले. ट्रॅक्टरजवळ असणारे पल्लवी भिमग लिंगसे (४), ऋषिकेश शंकर लिंगसे (८), विजय संतोष पवार (वय २६) व नारायण कचरु पवार (२२) हे गंभीर जखमी झाले. घटना परमेश्वर सखाराम लिंगसे यांच्या शेताजवळ झाली. या घटनेत ऋषिकेश लिंगसे हा गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबादकडे नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. इतर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तीर्थपुरी येथील पोलीस चौकीचे सपोउपनि. नागरगोजे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

टॅग्स :Blastस्फोटDeathमृत्यू