शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यास अश्रू अनावर, चांगला भाव मिळत असताना इकडं करपा रोगाने खाल्ला टोमॅटो

By विजय मुंडे  | Updated: July 15, 2023 17:46 IST

हाती आलेले पीक उपटून बांधावर टाकण्याची वेळ, लाखोंचा खर्च वाया

- फकिरा देशमुखभोकरदन : बाजारामध्ये टोमॅटोला विक्रमी १२० ते १५० रूपये किलोचा दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. परंतु, दुसरीकडे लाखो रूपयांचा केलेला खर्च करपा रोगामुळे मातीत गेल्याचे चित्र भोकरदन तालुक्यातील विविध भागात आहे. रोग पडल्याने टोमॅटो पिकावर दोन लाख रूपयांचा खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांना हाती आलेले पीक उपटून बांधावर टाकण्याची वेळ आली आहे.

कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटांच्या फेऱ्यात शेतकरी अडकत आहेत. त्यातच मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने, यंदाचा खरीप हंगामही लांबला आहे. भाजीपाला पिकांतून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांवर पडणाऱ्या रोगराईमुळे फटका बसला आहे. करपा रोगामुळे केवळ पाच दिवसातच पीक बसून जात असल्याने शेतकऱ्यांना उपाययोजना करण्यासाठी वेळही मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

भोकरदन येथील शेतकरी आप्पाराव देशमुख यांनी सांगितले की, शेडनेटमध्ये अर्धा एकर टोमॅटो लागवड केला, त्यासाठी 50 हजार खर्च केला. केवळ पाच कॅरेट निघाले., करपा रोग पडल्याने अख्खे पीक उपटून टाकावे लागले. तर ४० हजार खर्च करून अर्ध्या एकरात टोमॅटो लागवड केलेल्या इब्राहिमपूर येथील गोविंदसिंग भेडरवाल यांचाही अनुभव यापेक्षा वेगळा नाही. करपा रोगामुळे माल लागला नाही, केलेला खर्च निघेल की नाही, अशी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. मुठाड येथील राजेंद्र राठी यांनी अडीच एकरावर टोमॅटो लागवड केली. त्यासाठी दोन लाख खर्च केला, मात्र अचानक पूर्ण पिकावर करपा आला व हे पीक होत्याचे नव्हते झाले, त्यामुळे ते उपटून टाकावे लागले, असे राठी यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना