शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसाठी जुनी पेन्शन म्हटल्यास तिजोरीवर ताण; आमदारांना पेन्शन देताना कुठे जातो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 17:32 IST

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक संघटना आक्रमक; शासनाचे धोरण अन्यायकारक असल्याचा सूर

जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही, असे सांगितले आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील शिक्षक संघटनांमध्ये नाराजी पसरली असून, शासनाचे हे धोरण अन्यायकारक असल्याचा सूर निघत आहे. आमदारांना पेन्शन देताना तिजोरीवर ताण येत नाही का? असा संतप्त सवालही केला जात आहे.

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी विविध शिक्षक संघटनांनी वेळोवेळी शासन, प्रशासनाला निवेदने देण्यासह आंदोलनेही केली आहेत. अनेकवेळा मंत्री, अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही झाल्या आहेत. बैठकांमध्ये सकारात्मक भूमिका घेवू असे आश्वासन वेळोवेळी देण्यात आले होते. परंतु, हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करता येत नाही, असे शासनाकडून सांगण्यात आल्याने शिक्षक संघटनांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी सरकारी तिजोरीवर ताण येत असेल तर आमदारांना पेन्शन देण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर ताण येत नाही काय? असा भेदभाव फक्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कशासाठी? जुनी पेन्शन आमच्या हक्काची आहे आणि त्यासाठी आम्ही लढा  तीव्र करणार आहोत. शिवाय पेन्शन मिळवणारच असा आमचा निर्धार आहे.- ईश्वर गाडेकर, जिल्हाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना

जुन्या पेन्शन योजनेबाबत उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काढलेले उद्गार अत्यंत दुर्दैवी आहेत. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नसेल तर कर्मचारी संघटना अधिक आक्रमक होतील. शासनाने जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिक सकारात्मक निर्णय घ्यावा.- संतोष राजगुरू, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना

जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळाचा आधार असून, शासनाने २००५ नंतर सेवेत दाखल कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर कर्मचाऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल.- मंगेश जैवाळ, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रा.

शासकीय सेवेतील निवृत्तीनंतर व्यवस्थित पेन्शन मिळाली नाही तर त्यांचे भवितव्य अंधारात जाईल. लोकप्रतिनिधी ५ वर्षासाठी जितक्या वेळ निवडून येतात त्यांना त्याप्रमाणे निवृत्तिवेतन भेटते. जर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस योजना लाभदायक असेल व जुनी पेन्शन लागू केल्यास शासन आर्थिक दिवाळखोरीत जाणार असेल तर सर्व लोकप्रतिनिधींना ही जुन्या पेन्शन योजनेऐवजी एनपीएस योजना लागू करावी.- जावेद खान, जिल्हाध्यक्ष अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना

 जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी कवचकुंडल आहे. शासन सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना  पेन्शन लागू करणे ही घटनात्मक बाब आहे. २००५ नंतरच्या  कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन योजना शासनाकडून नाकारली जाणे ही बाब या सर्व कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक अशीच आहे.                  - अरुण जाधव, राज्याध्यक्ष शिक्षक संघटना समन्वय समिती.

टॅग्स :Teacherशिक्षकState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalanaजालना