शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जुनाट पूल कोसळला; जीवित हानी टळली ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:54 IST

पूर्णा नदीवरील निजामकालीन पूल बुधवारी सकाळी अचानक कोसळला

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : येथील पूर्णा नदीवरील निजामकालीन पूल बुधवारी सकाळी अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. हा पूल जालना- जळगाव मार्गावरील आहे.सन १९३४ च्या दरम्यान हा पूल दळणवळणाच्या साधणासाठी जालना- जळगाव मार्गावर येथील पूर्णा नदीपात्रात उभारण्यात आला होता. परंतु, मागील बारा वर्षांपूर्वी पूल जीर्ण झाला असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले होते.बांधकाम पूर्ण होताच नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, काही वाहनधारक जुन्या पुलाचाच वाहतुकीसाठी वापर करित होते. यामुळे तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या पुलावरून होणारी वाहतुक बंद असल्याचे फलक पुलाच्या दोन्ही बाजूंनी लावले होते. तरीही पुलावरून दुचाकीस्वारांसह काही वाहनचालक जात होते. वाळुची अवैध वाहतूक करणारे वाहनचालकही याच पुलाचा वापर करत होते. गत महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे पूर्णा नदीला पाणी वाहत आहे. याच दरम्यान या पुलावरून अवजड वाहने जात असल्याने बुधवारी सकाळी अचानक पूल कोसळला. सुदैवाने पूल कोसळताना पूलावर कोणीही नसल्याने अनुचित प्रकार टळला आहे. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी येथे भेट दिली. पुलाच्या दोन्ही बाजूने जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. पूर्णा नदीवरील दोन्ही पुलांच्या खाली अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात आहे. यामुळे निजामकालीन पुलाचा पाया उघडा पडून पुलाला धोका निर्माण झाला होता. याकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. यातच या पुलावरून वाळू वाहतूक करणारे वाहने जात होती. यामुळे हा पूल पडला असल्याचे सांगितले जात आहे. यापुढे नवीन पूलाखालील वाळू उत्खनन रोखण्यात यावे, अशी मागणी होत आहे.सदरील पूल जीर्ण झाल्याने नवीन पूल तयार करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, काही वाहनधारक जुन्या पुलाचाच वापर करत होते. यामुळे आम्ही जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी पूल बंद असल्याचे फलक लावले होते. मात्र, अवैध वाळू वाहतूक करणाºयांनी हे फलक काढून फेकून दिली होती. वाहतुकीसाठी याच पुलाचा वापर करत होते. शिवाय पुलाखालून वाळू उपसा होत असल्याचे आम्ही भोकरदन तहसीलदारांना सांगितले होते.- डी. एन. कोल्हे, उपअभियंता. सा. बां. विभाग.

 

टॅग्स :Accidentअपघातpwdसार्वजनिक बांधकाम विभागsandवाळूSmugglingतस्करी