शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वखारी येथील शेंद्री बोंडअळी निर्मूलन प्रकल्पाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:52 IST

कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि राष्ट्रीय पातळीवरील आयसीएआर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तीन वर्षांपूर्वी शेंद्री बोंडअळीने कापूस उत्पादकांना जेरीस आणले होते. या अळीच्या हल्ल्यामुळे कापसाचे उत्पादन कमी होऊन मोठा फटका कापूस उत्पादकांना बसला होता. यामुळे या अळीचे उच्चाटन करणे शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान होते. त्यासाठी जालना तालुक्यातील वखारी या गावाची कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि राष्ट्रीय पातळीवरील आयसीएआर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला होता.या वखारी येथील विशेष प्रकल्पाला रविवारी दिल्ली येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने भेट देऊन एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती जाणून घेतली. शेंद्री बोंडअळीमुळे झालेले नुकसान कमी करण्यासाठी या अळीवर नियंत्रण कसे मिळवावे, याबद्दलचे शास्त्रशुध्द धडे आयसीएआर आणि जालन्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिले. (पान २ वर)यावेळी वखारी येथील प्रगतशील शेतकरी निवृत्ती घुले, बळीराम घुले, सोपान घुले, रमेश काळे, श्रीराम आटोळे, रामेश्वर घुले, गजानन घुले, प्रल्हाद खैरे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष कापसाची पाहणी केली.बोंडअळी निर्मूलनासाठी राबविलेले उपक्रम या ठिकाणी प्रत्यक्षात आल्याने यंदा कापूस उत्पादनात भरीव वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रscienceविज्ञानFarmerशेतकरी