शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी समाज आक्रमक;अंतरवालीत GR ची होळी करत शासनाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:44 IST

'हा जीआर आमच्या पाठीत खंजीर खुपसणारा आहे,' असे आंदोलकांनी म्हटले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) :मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या हैद्राबाद गॅजेट लागू करण्याच्या जीआर विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषण ठिकाणी ओबीसी आंदोलकांनी या जीआरची होळी करत शासनाचा निषेध नोंदवला आहे. 'हा जीआर आमच्या पाठीत खंजीर खुपसणारा आहे,' असे आंदोलकांनी म्हटले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये या मागणीसाठी जरांगे-पाटील यांच्या उपोषणस्थळीच ओबीसी समाजाने आंदोलन सुरू केले आहे. अंतरवाली सराटीमधील सोनियानगरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी बांधवांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. उपोषणस्थळी शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरची होळी ओबीसी बांधवांकडून करण्यात आली.

ओबीसींचा घात करण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने शब्दछळ करून सगेसोयरे लागू करण्याच्या जीआरमधून केला आहे. झोपेत धोंडा घालण्याचं काम मुख्यमंत्री यांनी केल्याने या जीआरचा निषेध करत आम्ही त्याची होळी केली. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही आमच्या लेकरांबाळाच्या आरक्षणाचे संरक्षण करणार असल्याचे ओबीसी आंदोलक विठ्ठल तळेकर यांनी सांगितले. तसेच आता अंतरवाली सराटीतून ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी सर्वात तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील तळेकर यांनी दिला. 

ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसणारा जीआरशासनाने जो हैद्राबाद गॅजेटचा जीआर काढला  तो ओबीसी च्या पाठीत खंजीर खुपसणारा जीआर आहे.एकीकडे देवेंद्र फडवणीस साहेबांनी म्हणायचं की ओबीसी आमच्या डीएनए आहे. ओबीसीचा घात करण्याचं काम या महायुती सरकारने केल असल्याची टीका ओबीसी नेते बळीराम खटके यांनी केली आहे. ओबीसी बांधवांनी रस्त्यावरील लढाई लढण्याची गरज आहे. ओबीसींचा विश्वास मुख्यमंत्र्यावर होता मात्र मुख्यमंत्री यांनी आमचा घात केला, अशी टीका खटके यांनी केली.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना