शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टँकर्सची संख्या ४५ वर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:58 IST

दोन आठवड्यांपूर्वी ३९ असलेली टँकरची संख्या आत्ता ४५ वर गेली आहे. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दिवसेदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागातील जलसाठ्यांत घट झाल्याने पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी ३९ असलेली टँकरची संख्या आत्ता ४५ वर गेली आहे. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जाफराबाद, भोकरदन या तालुक्यांतही बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र, या दोन्ही तालुक्यांत कडक खडक असल्याने कितीही पाऊस पडला तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. परिणामी लघु मध्यम प्रकल्प, बोअरवेल, विहिरी आदींना पाणीच राहत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. जलसाठा वाढत नसल्याने या तालुक्यांत टँकरची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जाफराबाद तालुक्यात १६ टँकर, भोकरदन तालुक्यात २७ टँकवरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच जालना आणि परतूर तालुक्यात सुध्दा काही भाग खडकाळ असल्याने अल्प प्रमाणात टँकरची मागणी आहे.वाढते सिंचन आणि जायकवाडी धरणाचा परिसर असल्याने अंबड, घनसावंगी, मंठा आणि बदनापूर या तालुक्यांत वाढलेल्या सिंचनामुळे अद्याप टँकरची मागणी आलेली नाही. मात्र, आगामी काळात मागणी होण्याची शक्यता अधिका-यांनी व्यक्त केली आहे. टंचाईकृती आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. उपाययोजना आखण्यात आलेली आहे. मागणीनुसार टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.जिल्ह्यातील जलसाठे कमी होत असल्याने टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जलयुक्तच्या कामांमुळे तात्पुरत्या स्वरुपात साठा वाढला. पण तोही आटल्याने येत्या काळात टंचाई भीषण होण्याची शक्तय गृहित धरुन प्रशासनाने उपाययोजना आखली आहे. टॅकर्सची संख्या शतक गाठण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाई