शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्या प्रवाशांची संख्या दीडपट वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:26 IST

विकास व्होरकटे। लोकमत न्यूज नेटवर्क जालना : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जालना जिल्ह्यातील बसेसमध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांच्या संख्येत ...

विकास व्होरकटे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जालना जिल्ह्यातील बसेसमध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. मागील वर्षी सात महिन्यांच्या कालावधीत ९० फुकटे प्रवासी आढळून आले होते, तर यंदा एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत यात तब्बल दीडपट वाढ झाली असून, यावर्षी १९० प्रवाशी फुकट प्रवास करतांना आढळले.बसमध्ये फुकट प्रवाशांनी प्रवास करू नये, त्यांच्यावर वचक असावा, यासाठी एसटी महामंडळातर्फे जालना जिल्ह्यात ३ पथके मार्ग तपासणीसाठी २४ तास कार्यरत आहेत. हे पथके बाहेरील जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात येणाऱ्या बसेस व जिल्ह्यातील सर्व बसमधील वाहक व प्रवाशांची तपासणी करतात. यात फुकट प्रवास करणाºया प्रवाशांवर व पैसे घेवूनही प्रवाशांना तिकीट न देणाºया वाहकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करतात.यंदा एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात पथकाने १३ हजार ५०० बसची तपासणी करण्यात आली. यात २ हजार ४६८ वाहकांची तपासणी केली. यावेळी १८ वाहकांनी पैसे घेवूनही प्रवाशांना टिकिट न दिल्याचे आढळून आले. तर तपासणी केलेल्या १३ हजार ५०० बसमध्ये १९० प्रवाशी विना तिकीट प्रवास करित असल्याचे तपासाणीत उघड झाले आहे. यांच्याकडून पथकाने २१ हजार ५४८ रू. दंड व बुडविलेले भाडे ९ हजार ७५० रू. असे एकूण ३१ हजार २९८ रूपये वसूल करण्यात आले असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळtourismपर्यटन