शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

जालना जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या ४५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 23:57 IST

रविवारी जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मात्र, सोमवारची सकाळ सुरू झाली ती नेहमीच्या वर्दळीने! ना कोरोनाची भीती ना कलम १४४ चे गांभीर्य!

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रविवारी जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मात्र, सोमवारची सकाळ सुरू झाली ती नेहमीच्या वर्दळीने! ना कोरोनाची भीती ना कलम १४४ चे गांभीर्य! दुकानांना टाळे असले तरी मुख्य रस्त्यावरील वाहने आणि एकत्रित येऊन गप्पा रंगविणारे लोक, असे चित्र सोमवारी सायंकाळपर्यंत दिसून आले. जिल्ह्यात संशयितांची संख्या ४५ वर गेली असून, जिल्ह्यात केवळ केवळ २५ व्हेंटिलेटर आहेत. दरम्यान, सूचनांचे पालन होत नसल्याने शासनाने सोमवारी सायंंकाळी संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी या कालावधीत तरी घरात बसणे अपेक्षित आहे.कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असून, देशातील, महाराष्ट्रातील रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. जालना जिल्ह्यात पुणे, मुंबईच नव्हे तर विदेशातूनही शेकडो नागरिक शहरी, ग्रामीण भागात आले आहेत. पैकी अनेकांची आरोग्य तपासणी झालेली नाही. चक्क पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला असे लोक शोधून काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावे लागत आहेत. जालना येथील जिल्हा रूग्णालयात सुरू असलेल्या विलगीकरण कक्षात सोमवारी दुपारपर्यंत ४५ संशयितांना दाखल करण्यात आले आहे. पैकी १० जणांच्या स्वॅबचे अहवाल सुदैवाने निगेटिव्ह आले आहेत. ३४ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. एकूण ११८ विदेशी प्रवाशांचे विलगीकरण केले आहे. जिल्ह्यात १४२१ सर्दी, ताप असलेल्या रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले आहेत. गत काही दिवसांपासून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह सर्वच प्रशासकीय यंत्रणा कोरोनाबाबत जागृती करीत आहे. गरज असेल तरच बाहेर पडावे, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर १४ मार्च रोजी जिल्ह्यात बंद ठेवण्यात आला होता. या बंदच्या काळात दुकाने बंद आणि नागरिक रस्त्यावर अशी स्थिती होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. या कर्फ्यूमध्ये दिवसभर सहभागी होणाऱ्या अनेकांनी दरात येऊन टाळ्या वाजवित स्वागत केले. मात्र, काही महाभागांनी चक्क रस्त्यावर एकत्रित येऊन फटाके फोडून जल्लोष केला. हे युध्द डोळ्यांना न दिसणा-या कोरोना विषाणूशी आहे, याचे भान काहींना राहिलेले नाही. दुस-या दिवशी सोमवारी कलम १४४ लागू, लॉक डाऊन असल्याने महत्त्वाच्या आस्थापना वगळता इतर दुकाने बंद होते. तरीही रस्त्यावर नागरिक दिसत होते. ठिकठिकाणी गर्दी आणि रंगलेल्या चर्चा..!, हे चित्र होते.आदेशाचे उल्लंघन : पोलिसांकडून गुन्हे दाखलरविवारी जनता कर्फ्यू होता. मात्र, या कालावधीत दुकाने सुरू ठेवणा-या सहा जणांविरूध्द भोकरदन, जाफराबाद, जालना, सेवली, आष्टी ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अवैध दारूविक्री करणाºया कारवाई करून ८०७० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.भोकरदन तालुक्यात नाही व्हेंटिलेटरची सोय४भोकरदन शहरातील शासकीय रूग्णालयासह तालुक्यातील एकाही खाजगी रूग्णालयात व्हेंटिलेटरची सोय नाही. अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना विषाणूबाबत अधिक सतर्कता बाळगावी. शिवाय तालुक्यात अत्यावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सMarketबाजार