शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आता मुदत वाढवून मिळणार नाही; 23 डिसेंबरला ठरवणार पुढची दिशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 06:38 IST

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क   जालना/ वडीगोद्री : मराठा आरक्षणासाठी शासनाला २४ डिसेंबरची अंतिम मुदत दिली आहे. यामुळे शासनाने महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे. सरकारची भूमिका आरक्षणाच्या बाजूने दिसली नाही, तर २३ डिसेंबरला बीडमध्ये होणाऱ्या सभेत आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

अंतरवाली सराटी येथे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी बैठक झाली. यावेळी उपस्थित समाज बांधवांशी जरांगे पाटील यांनी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेल्या २४ डिसेंबरच्या मुदतीवर ठाम असल्याचेही ते म्हणाले. 

आता उपोषण नकोजरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केल्यानंतर आंदोलनाची तयारी करण्यासाठी काही दिवस उपोषण करावे का, असा प्रश्न समाजबांधवांना विचारला. त्यावेळी २४ डिसेंबरनंतर उपोषण नको, पुढील दिशा जाहीर करा, अशी आग्रही मागणी समाजबांधवांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्षnमंत्री उदय सामंत यांनी सकाळी मोबाइलवर संवाद साधून शासन दिलेल्या आश्वासनांवर ठाम असल्याचे सांगितले.nविधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाची भूमिका सोमवारी मांडणार आहेत. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा आज जाहीर करायची नाही. गनिमीकाव्याने लढायचे असे जरांगे पाटील म्हणाले. यामुळे मुख्यमंत्री शिंदे विधिमंडळात सोमवारी कोणती भूमिका मांडणार याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.nआजवर ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्याचा आधार घेऊन शासनाने मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, नोकरभरतीसाठी पात्र  १३ हजार मराठा युवकांना नियुक्त्या द्याव्यात, आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती करू नये, असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण