शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता महिन्यातून चार वेळा पाणी सोडण्याचे पालिकेचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:52 IST

पंधरा दिवसानंतर एकदा सुटणारे पाणी आता आठ दिवसांवर आणण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराला पंधरा दिवसानंतर एकदा सुटणारे पाणी आता आठ दिवसांवर आणण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे. चंदनझिरा, ४८८ विश्रामगृह, आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बांधण्यात आलेल्या तीन टाक्यांमध्ये पाणी जायकवाडीतून आलेले पाणी साठविण्यात येणार आहे. यामुळे पाण्याची नासाडी कमी होऊन नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार आहे.सध्या ९० किमी.वरुन पैठण येथील जायकवाडी धरणातून शहरासाठी २० एमएलडी पाणी उचलले जाते. यातील ५ एलएमडी पाणी अंबड शहराला वितरित केले जाते. ३ एमएलडी पाणी गळती होते. यामुळे शहराला फक्त १२ एमएलडी पाणी मिळत आहे. आलेले १२ एमएलडी पाणी साठविण्याची क्षमता नगरपालिकाकडे नसल्याने आलेले पाणी जसेच्या तसे शहरात सोडल्याशिवाय पालिका प्रशासना कडे सध्या पर्याय नाही. यामुळे दोन दोन तास पाणी शहरात सोडण्यात येत आहे. यामुळे हजारो लिटर पिण्यायोग्य पाणी नाल्यामध्ये वाहून जात आहे. उन्हाची वाढती तीव्रता बघता नगरपालिका प्रशासनाने चंदनझिरा येथे १० लाख लिटर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात १० लाख लिटर तसेच शासकीय विश्रामगृह ४८८ येथे १० लाख लिटर अशा ३० लाख लिटर पाणी साठवेल या क्षमतेच्या टाक्या बांधल्या आहेत. येत्या आठ दिवसांत या तिन्ही टाक्यांमध्ये जायकवाडीतून आलेले पाणी साठविण्यात येणार आहे. यामुळे योग्य नियोजन करुन शहराला पाणी पुरवठा होणार आहे याचा नियोजन पालिका प्रशासनाने केले असून आता महिन्यातून किमान चार वेळा पाणी पुरवठा करण्यावर आमचा भर असणार आहे.व्हॉल्व्हची गळती थांबविलीजायकवाडीतून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला अंबड तालुक्यातील चिंचखेड येथे गळती लागली होती. यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. यामुळे शहरात दोन दिवसांपासून निर्जळी होती.यामुळे पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय झाली होती. नगरपालिका प्रशासनाने युध्दपातळीवर काम करून चिंचखेड, शेवगा पाटी, आणि पाचोड परिसरातील चार ठिकाणची लागलेली गळती थांबविली.

टॅग्स :WaterपाणीJalana Muncipalityजालना नगरपरिषद