शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना आता सरकारच देणार बिलबुक छापून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:03 IST

भविष्यात व्यापा-यांना सरकारकडूनच बिलबुक छापून मिळणार असून, त्याची आॅनलाइन नोंदणी केल्यावर त्या तुलनेत हे बिलबुक व्यापा-यांना देण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जीएसटी नंतर आता केंद्र सरकारने ई-वेबिल प्रणाली लागू केली आहे. या प्रणालित कुठेही आणि केव्हाही ट्रक अथवा अन्य वाहन थांबवून त्यातील मालाची तसेच सोबत असलेल्या बिलाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासह भविष्यात व्यापा-यांना सरकारकडूनच बिलबुक छापून मिळणार असून, त्याची आॅनलाइन नोंदणी केल्यावर त्या तुलनेत हे बिलबुक व्यापा-यांना देण्यात येणार आहे.एकूणच सध्या बाजारात खरीप हंगामाची लगबग दिसून येत आहे. बियाणे, खते तसेच शेती संबंधित इतर सािहत्य खरेदीसाठी बाजारपेठेत शेतक-यांची गर्दी दिसून येत आहे. यंदा चांगल्या हवामानाच्या अंदाजाने शेतकरी सुखावला आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडेल अशी आशा वर्तवली जात आहे.गेल्या काही दिवसांमध्ये घसरलेले साखरेचे दर आता सरकारच्या नवीन धोरणामुळे हळूहळू वाढत आहेत. साखर कारखान्यातील दरापेक्षा खुल्या बाजारातील साखरेच्या दरात ३०० रूपयांनी तेजी आली आहे. ई-वेबिल देताना पाठवण्यात येणा-या व्यापा-याचा संपूर्ण तपशील द्यावा लागणार आहे. पेट्रेल, डिझेलच्या दरवाढीमुळे सर्व साहित्याचे दर हे वाहतुकीसाठी पाच ते दहा रूपयांनी वाढल्याने महागाईत भर पडत आहे.जालना येथील मोंढ्यात सध्या गहू, ज्वारी, सोयाबीन तसेच गुळाची आवक चांगली आहे. तूरीची आवकही दररोज एक हजार पोती अशी आहे. धान उत्पादन कमी झाल्याने त्याचा परिणाम पोह्यांचे दरवाढण्यावर झाल्याचे सांगण्यात आले. तूर, मूग, मसूर डाळीत किंचितशी तेजी आहे, तर उडीद डाळीत ५०० रूपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. साबुदाण्याचे दरही वाढले आहेत.

टॅग्स :billबिलMarketबाजार