शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.ना मिळणार विना निविदा लाखाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : ग्रामपंचायतींना विना निविदा कामे देण्याच्या मुद्यावरून सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सीईओ ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामपंचायतींना विना निविदा कामे देण्याच्या मुद्यावरून सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सीईओ निमा अरोरा यांनी घेतलेल्या भूमिकेवरून सदस्य संतप्त झाले होते. २३ मार्च २०१५ च्या अध्यादेशाचा आधार देत अरोरा यांनी विना निविदा ३ लाखांवरील कामे देण्यास विरोध दर्शवला होता. मात्र, नंतरचे जे शुध्दीपत्र आले होते, त्या बद्दल खुद्द अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी मध्यस्ती करून अरोरा यांनी हट्ट सोडवा असे सांगितले. या मुद्यावरून सभा काही वेळासाठी तहकूब करण्यात आली होती.सोमवारी दुपारी स्व. यशवंतराव सभागृहात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभा सुरू असतांनाच विद्यार्थ्यांचा किलबिलाट थेट सभागृहात ऐकण्यास मिळाल्याने सर्वजण अवाक झाले. २५ ते ३० विद्यार्थी थेट सभागृहाच्या व्यासपीठाजवळील रिकाम्या जागेत ठाण मांडून बसले. आम्हाला शिक्षक देण्याची मागणी त्यांनी उचलून धरली. थेट विद्यार्थी सभागृहात आल्याने शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला. नुकत्याच जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यामुळे अनेक शाळांवरील शिक्षक रूजू होतांना काही तांत्रिक बाबींची अडचण असल्याचे सीईओ अरोरा यांनी मान्य केले. हे विद्यार्थी भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील जि.प. शाळेचे होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश फुके यांच्यासह अन्य जिल्हा परिषद सदस्य शालिग्राम म्हस्के, राहुल लोणीकर यांनीही शिक्षकांच्या बदल्यांसह मोडकळीस आलेल्या शाळाखोल्यांच्या मुद्यावरून अरोरा यांना धारेवर धरले. यावेळी ग्रामपंचायतींना कामे देतांना ती पूर्वीच्या अध्यादेशानुसार ई-निविदा काढल्यावरच द्यावेत असा जीआर होता.परंतु नंतर त्यात २१०८ मध्ये सुधारणा करून शुध्दीपत्रक काढल्याचे पदाधिकाऱ्यांनी अरोरा यांच्या लक्षात आणून दिल्यावर अरोरा यांनी आपला हट्ट मागे घेतला. तसेच यापुढे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दहा ते १५ लाख रूपयांपर्यंतची कामे ही विना निविदा करण्यास मान्यता दिली. असे असेले तरी ज्यावेळी एक लाख रूपयांपेक्षा अधिकचे साहित्य खरेदी करायचे झाल्यास त्यांसाठी मात्र निविदा काढूनच ते खरेदी करण्याचा मुद्दा निमा अरोरा यांनी सभागृहात मांडून तो मंजूर करून घेतला.या एकाच मुद्या भोवती आज सर्वसाधारण सभा चार तास चालली. यावेळभ दुष्काळ, पाणी टंचाई, लांबलेला पाऊस यावर चर्चा होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. यावेळी अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, सर्व विषय समित्यांचे सभापती आणि विभागप्रमुख उपस्थित होते. या सभेत गोंधळामुळे महिला सदस्यांना प्रश्न मांडता आले नाहीत्र.सभा : अध्यक्ष, उपाध्यक्षांचा पारा चढलाहिसोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सभागृहात दाखल झाल्याने अध्यक्ष अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष सतीश टोपे हे जाम चिडले होते. यावेळी विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांना सभागृहात येऊन आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार नसल्याचे खोतकर म्हणाले.तर टोपे यांनी देखील अशीच रि ओढून बाहेरच्या सदस्यांना सभागृहता बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. तसेच तुमचे प्रतिनिधी येथे मुद्दा मांडत आहेत. तुम्ही सभागृहा बाहेर जावे असे सांगितले. यामुळे विद्यार्थी व पालकांनी आम्हाला सभागृहातून अक्षरश: हुसकावून लावल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.अविश्वास पर्यंत मजलग्रामपंचायतींना कामे देण्याच्या मुद्यावरून मु्ख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी जी भूमिका घेतली. ती सदस्यांना मान्य नव्हती. परंतु यावर माघार घेण्यास अरोरा तयार नसल्याने बराच वाद निर्माण झाला.काही सदस्यांनी तर अरोरा यांच्याविरूध्द अविश्वास ठराव मांडवा असा आग्रह धरला. परंतु त्याला सर्वसंमती मिळाली नाही. त्यामुळे हा सदस्यांचा मनसुभा वास्तवात उतरला नाही. अनेक जिल्हा परिषद सदस्य हे विविध मुद्यावरून संतप्त झाले होते.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEducationशिक्षणcivic issueनागरी समस्याgram panchayatग्राम पंचायत