शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'आमची कोणाला ना नाही...'; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रस्तावावर जरांगे सकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:46 IST

बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस: मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या: मनोज जरांगे

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : आम्ही खुनशी नाही, आमची कुणाला ना नाही, आम्ही जातीयवादी नाही, आम्ही काय दहशतवादी आहे का ? असा सवाल करत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या चर्चेच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आमचं लोकांबद्दल वाईट मत नाही. आमची कोणाला ना नाही. सगळं देश इथे येऊन गेला आहे, असे म्हणत पालकमंत्री मुंडे यांच्या भेटी संदर्भात निरोप पाठवेन आणि त्यांच्या निरोपची वाट पाहिलं या व्यक्तव्यावर जरांगे यांनी मत व्यक्त केले. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासोबत अनेक मराठा बांधवही उपोषणाला बसले आहेत.आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सकाळी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना जरांगे म्हणाले, सरकारने संपर्क करण्याची आवश्यकता नाही. त्यांची गरज नाही. समाजाला शत्रू कोण हे कळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. माझ्या मनात काही नाही, मराठ्यांच्या ठरलेल्या मागण्या मान्य करा, असे उत्तर त्यांनी उदय सामंत यांना दिले. 

देशमुख कुटुंबांनी सहभागी होण्याची गरज नाही ते दुःखात आहे. मी बाकी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडा म्हणून सांगितलं आहे. माझ्या शरीराच वाटोळे झाले यांचे व्हायला नको. अशोक चव्हाण  भेटीला येणार आहे,  यावर बोलताना जरांगे म्हणाले, मध्यस्थी त्यांनी करावी, की दुसऱ्या कोणी आमची ना नाही. आमच्या लेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. आमच्या लोकांचं वाटोळे होत आहे हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बघितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या गुंडगिरी संपवायची की राहू द्यायची, अशी टिका संतोष देशमुख प्रकरणावर जरांगे यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांच्यासह १०२ जण उपोषणालामनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जरांगे यांच्यासोबत या सामूहिक आमरण उपोषणात अनेक मराठा आंदोलक देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे यांची डॉक्टरांकडून सकाळी तपासणी करण्यात आली. जरांगे यांची ब्लडशुगर खालावली आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी वैष्णवी नरवडे यांनी दिली आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे''त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो, तेथील वातावरण कसे असते, ही जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे, ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोपही पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन'', असे जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेटीवर प्रतिक्रिया दिली होती.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना