शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ना कोरोनाची दहशत, ना संचारबंदीची भीती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 23:54 IST

जालनेकर अद्यापही कोरोना विषाणूला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नाहीत. बहुतांश दुकाने बंद असून, संचारबंदी लागू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालनेकर अद्यापही कोरोना विषाणूला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नाहीत. बहुतांश दुकाने बंद असून, संचारबंदी लागू आहे. मात्र, तरीही मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रमुख रस्त्यांवरील वाहनांसह पादचाऱ्यांची वर्दळ कायम होती. सीमावर्ती भागात तब्बल ३२ ठिकाणी चेकपोस्ट तयार करून येणा-या- जाणा-या वाहनांची तपासणी केली जात आहे. तर जालना शहरातील विविध भागांत ९ ट्रॅक्टरद्वारे फवारणी केली जात आहे.जालना जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत ५२ संशयित आढळून आले आहेत. पैकी ४२ जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात शनिवारी २१ मार्च रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले होते. मात्र, शनिवारी दिवसभर दुकाने बंद आणि नागरिक रस्त्यावर अशीच अवस्था जालना शहरासह जिल्हाभरात होती. दुसºया दिवशी रविवारी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू कडकडीत पाळण्यात आला. मात्र, सायंकाळी ५ नंतर टाळ्या, थाळ्या वाजविण्यासाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांची रहदारी रात्री उशिरापर्यंत कायम होती. संपूर्ण राज्यातच असे चित्र असल्याने शासनाने सोमवारी सायंकाळी संचारबंदी लागू केली. किमान संचारबंदीमुळे तरी नागरिक घरात बसून कोरोनाशी लढा देतील, अशी अपेक्षा शासन, प्रशासनाला होती. मात्र, मंगळवारी सायंकाळपर्यांत पर्यंत तरी जालना शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची रहदारी कायम होती. पोलीस दलाच्या वतीने चौका-चौकात बंदोबस्त लावण्यात आला आहे. विशेष पथके शहरभर फिरून आवश्यकता नसताना घराबाहेर फिरू नये, घरात बसावे, असे आवाहन करीत आहेत. मात्र, रस्त्यावरील वर्दळ कायम असून, जालनेकरांच्या मनात ना कोरोनाची दहशत ना संचारबंदीची भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी आता हातात दांडुका घेऊन सक्ती केल्यानंतच रस्ते निर्मनुष्य होणार का, असाच प्रश्न आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले आहे.पालेभाज्या, फळे, किराणा साहित्य इ. जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र, तोंडाला मास्क न लावणे, एकाच ठिकाणी पाचहून अधिक जण जमा न होणे यासह इतर दक्षता घेतली जात नसल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBharat Bandhभारत बंद