परंतु मध्यंतरी युती सरकारने तीन लाख रूपयांची मुदत ठेवली होती. त्यामुळे उलाढाल मंदावली होती. त्यामुळे साधारणपणे ९० कोटी रूपयांपर्यंतच उलाढाल या संघाच्या माध्यमातून होत आहे.
या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या संचालकांमध्ये संभाजी वाकडे, संजय पातेकर, विजय राऊत, दादाराव पाचफुले, सय्यद अकबर, केशव खरात, बबन गाडेकर, रमेश कुलकर्णी, सुभाष लहाने, जयश्री मोरे, कांताबाई रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, प्रल्हादसिंग राजपूत यांचा समावेश होता. या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी जालना सहकार निबंधक पी. बी. वरखडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी त्यांना शरद तनपुरे, प्रदीप मघाडे यांनी सहकार्य केले.
यामुळे आला अविश्वास ठराव
या मजूर संघाचे विद्यमान अध्यक्ष नानाभाऊ उगले यांच्यावर संचालकांनी अविश्वास ठराव आणून तो गुरूवारी मंजूर केला. ज्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला त्यातील प्रमुख कारणांमध्ये संचालकांनी सभेत मंजुरी दिलेल्या विषयांकडे दुर्लक्ष करणे, मनमानी करणे, बँकेतील ठेवी मोडणे, अपमानास्पद वागणूक देणे, वेळेवर शुल्क वसूल न करणे यासह अन्य मुद्यांवरून अध्यक्ष उगले यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.