शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीवरील निझामकालीन पूल कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 16:27 IST

सन १९३४ च्या दरम्यान हा पूल दळणवळणाच्या साधणासाठी जालना- जळगाव मार्गावर येथील पूर्णा नदीपात्रात उभारण्यात आला होता.

ठळक मुद्देदुर्घटने दरम्यान कोणतीही जिवितहानी नाही नवीन पूलावरील वाहतुकीत होणार वाढ 

केदारखेडा (जालना) : येथील पूर्णा नदीवरील निझामकालीन पूल बुधवारी सकाळी अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. हा पूल जालना- जळगाव मार्गावरील आहे. 

सन १९३४ च्या दरम्यान हा पूल दळणवळणाच्या साधणासाठी जालना- जळगाव मार्गावर येथील पूर्णा नदीपात्रात उभारण्यात आला होता. परंतु, मागील बारा वर्षांपूर्वी पूल जिर्ण झाला असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. बांधकाम पूर्ण होताच नविन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, काही वाहनधारक जुन्या पूलाचाच वाहतुकीसाठी वापर करित होते. यामुळे तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत सा. बां. विभागाने जुन्या पुलावरून होणारी वाहतुक बंद असल्याचे फलक पूलाच्या दोन्ही बाजूने लावले होते. तरिही पुलावरून दुचाकीस्वारांसह काही वाहनचालक जात होते. वाळुची अवैध वाहतुक करणारे वाहनचालकही याच पुलाचा वापर करित होते. 

गत महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे पूर्णा नदिला पाणी वाहत आहे. याच दरम्यान या पूलावरून अवजड वाहने जात असल्याने बुधवारी सकाळी अचानक पूल कोसळला. सुदैवाने पूल कोसळताना पूलावर कोणीही नव्हते. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथे भेट दिली. पुलाच्या दोन्ही बाजूने जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून पूलावरील वाहतुक बंद करण्यात आली. 

उत्खननामुळे पडला पूलपूर्णा नदीवरील दोन्ही पुलाच्या खाली अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. यामुळे निजामकालीन पुलाचा पाया उघडा पडून पुलाला धोका निर्माण झाला होता. याकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. यातच या पुलावरून वाळू वाहतुक करणारे वाहने जात होती. यामुळे हा पूल पडला असल्याचे सांगितल्या जात आहे. यापुढे नविन पूलाखालील वाळू उत्खन रोखण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

पुलावरून अवैध वाहतूक सुरुच होती सदरील पूल जिर्ण झाल्याने नविन पूल तयार करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, काही वाहनधारक जुन्या पूलाचाच वापर करित होते. यामुळे आम्ही जुन्या पुलाच्या दोन्ही बाजुनी वाहतुकीसाठी पूल बंद असल्याचे फलक लावले होते. मात्र, अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यांनी ही फलके काढुन फेकून दिली होती. वाहतुकीसाठी याच पूलाचा वापर करित होते. शिवाय पुलाखालून वाळू उपसा होत असल्याचे आम्ही भोकरदन तहसीलदारांना सांगितले होते. - डी. एन. कोल्हे, उपअभियंता. सा. बां. विभाग.

टॅग्स :riverनदीPurna Riverपूर्णा नदीJalanaजालना