शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात काढले नऊ हजार पासपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:26 IST

गेल्या वर्षभरात नऊ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पासपोर्ट काढल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परदेशात जाऊन शिक्षण तसेच नोकरी करण्याकडे आता भारतीयांचा कला वाढला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात पासपोर्ट काढता यावा यासाठी येथील इंडियन ख्रिश्चन युनायटेड ब्रिगेडचे पदाधि कारी राहुल शिंदे यांनी मोठा पाठपुरावा करून जालन्यातील पोस्ट आॅफिसमध्ये पासपोर्ट काढण्याचे केंद्र सुरू केले. या केंद्रातून गेल्या वर्षभरात नऊ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पासपोर्ट काढल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांची जवळपास पावणेतीन कोटी रूपयांची बचत झाली आहे.केरळमध्ये प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट काढण्यासाठीचे केंद्र आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ते सुरू करावेत म्हणून, राहुल शिंदे यांनी पाठपुरावा केला. पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठीनागपूर अथवा मुंबईला जावे लागत असे. त्यामुळे प्रवास खर्च, वेळ तसेच अन्य अडचणी येत असत, हे टाळण्यासाठी प्रारंभी शिंदे यांनी संबंधित विभागाकडे अर्जफाटे केले. मात्र, त्याचा कुठलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे शिंदे यांनी थेट औरंगाबाद येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन महाराष्ट्रानेही प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट काढण्यासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्याचा आदेश दिला होता. विशेष म्हणजे ही जनहित याचिका दाखल करताना न्यायालयाने त्यांच्याकडून कोर्ट फीसही घेतली नव्हती. शिंदे यांच्याकडून अ‍ॅड. सोळंके यांनी बाजू मांडली होती.गेल्या वर्षी जालना येथील मुख्य पोस्ट कार्यालयात हे पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू झाले. त्यासाठी विद्यमान खासदारांनी देखील केंद्र पातळीवर मदत केल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला आहे.एकूणच वर्षभरात जालन्यातील नागरिकांना अत्यंत सोप्या पध्दतीने हा पासपोर्ट काढता आला. त्यामुळे एक तर नागरिकांचा वेळ आणि पैसा अशी दोन्हींची बचत झाली. पूर्वी नागपूर अथवा मुंबई येथे जाण्यासाठी किमान तीन हजार रूपयांचा खर्च एका व्यक्तीला येत होता. तो खर्च वाचला असून, खर्चा सोबतच वेळेची मोठी बचत झाल्याचे सांगण्यात आले.आज अनेक जण कुठल्याही प्रकरण हे सरकारनेच पूर्ण करावेत अशी अपेक्षा करतात. परंतु सरकार म्हणजे एक वटवृक्ष असतो. त्याच्या पारंब्या दूरवर तर गेलेल्या असतात, मात्र, त्यांना कुठे काय करावे याचा ताळमेळ नसतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या हक्कांबाबतीत स्वत: जागृत राहणे गरजेचे आहे. कोणतीच गोष्ट सहजा-सहजी मिळत नाही. त्यासाठी प्रशासकीय, न्यायालयीन संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. ती आपण ठेवली आणि त्यात सर्वांच्या सहकार्याने यश आले. आज जालन्यात हे केंद्र सुरू होऊन नागरिकांना मदत होत असल्याचे मोठे समाधान आपल्याला आहे.- राहुल शिंदे, जालना

टॅग्स :passportपासपोर्टSocialसामाजिक