शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पिटलाइनमुळे जालन्यातून सुटणार नवीन रेल्वे: रावसाहेब दानवे

By विजय मुंडे  | Updated: March 13, 2024 19:33 IST

जोपर्यंत पिटलाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणे शक्य नव्हते.

जालना : पायाभूत सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तोपर्यंत जिल्ह्याचा विकास होत नाही. त्यामुळे आपण रेल्वे विभागासह विद्युत, सिंचन, रस्त्यांची अधिकाधिक कामे करण्यावर भर दिला आहे. त्यातून पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढील काळ हा अमृतमहोत्सवाचा काळ असल्याचे सांगितले आहे. या काळात देशाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यावर त्यांचा भर राहणार असून, यात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. पिटलाईन सुरू झाल्याने जालना रेल्वे स्थानकातून नवीन रेल्वे सुटणार असल्याचेही ते म्हणाले.

जालना येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात १०० कोटी रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या पिटलाईनचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी रेल्वे विभागाच्या डीआरएम नीती सरकार, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उद्योजक घनश्याम गोयल, बद्री पठाडे, सिद्धिविनायक मुळे, भास्कर दानवे, आदींची उपस्थिती होती.

जोपर्यंत पिटलाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणे शक्य नव्हते. पिटलाईनमुळे जालना येथून नवीन गाड्या सोडता येणार आहेत. जालन्यात कामाला येणाऱ्या बिहार, उत्तर प्रदेशातील कामगारांसाठी सुरू झालेली छपरा गाडी महत्त्वाची ठरणार आहे. तिरूपती, जनशताब्दी, वंदे भारतही जालन्यातून सुरू केली आहे. मनमाड, नांदेड येथून गाड्या मेन्टेनन्ससाठी येणार आहेत. त्यामुळे रोजगारही उपलब्ध होणार आहे. जालन्यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथेही पिटलाईन झाल्याचेही दानवे यांनी सांगितले. संजय देठे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.

मैलाचा दगड रोवला गेला : चव्हाणजिल्ह्याच्या इतिहासात आज एक मैलाचा दगड रोवला गेला आहे. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून अनेक रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. पिटलाईन महत्त्वाची ठरणार आहे. सात-आठ वर्षाच्या कालखंडात जिल्ह्याचा गतीने विकास झाला आहे. यापुढेही जिल्ह्याच्या विकासाचा आलेख वाढतच राहील, असा विश्वास माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाrailwayरेल्वे