शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सायबर भामट्यांचा नवा फंडा; 'वर्क फ्रॉम होम' टास्कच्या आमिषाने ३५ लाखांना गंडवले

By दिपक ढोले  | Updated: September 11, 2023 12:52 IST

जास्तीच्या पैशांचे आमिष पडले महागात; खबरदारी घेण्याचे आवाहन

जालना : ‘नमस्कार... मी एका कंपनीतून बोलतेय, तुम्हाला घरबसल्या काम पाहिजे असेल तर एक टास्क दिले जाईल, ते पूर्ण करा, त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील,’ असे सांगून जिल्ह्यात जवळपास सहाजणांना ३५ लाख २५ हजार ५०० रुपयांना सायबर भामट्यांनी गंडा घातला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील तीन महिला व तीन पुरुषांची अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे. संबंधित व्यक्ती टेलिग्राम, व्हॉट्सॲपवर मेसेज करून किंवा फोन करून मी अमुक कंपनीतून बोलताेय, तुम्हाला घरबसल्या पैसे कमविण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करा. त्यासाठी तुम्हाला काही पैसे भरावे लागतील. हे पैसे भरल्यानंतर काहीवेळातच ते पैसे फिर्यादीच्या आयडीवर दुप्पट झालेले असतील, अशी वेगवेगळी कारणे देऊन फिर्यादीकडून पैसे घेतले जातात. कोणी दोन तर कोणी तीन लाख रुपये देतात. पैसे काढण्याची मागणी केली असता, ती लिंक ब्लॉक होऊन जाते. अशाच प्रकारे जिल्ह्यात मागील महिनाभरात जवळपास सहाजणांची ३५ लाख २५ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टास्क पूर्ण करण्यास सांगून शिक्षकाला ९३ हजारांना गंडाटास्क पूर्ण करण्याचे सांगून सुरुवातीला १५० व १३०० रुपये ऑनलाइन पाठवून एका शिक्षकाला सायबर भामट्यांनी ९३ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात शहरातील मुर्गी तलाव भागात राहणारे शिक्षक आशिष मुरलीधर उपाध्याय (४९) यांनी फिर्याद दिली आहे.

तरुणाला तीन लाखांना घातला गंडासायबर भामट्यांनी टेलिग्राम आयडीच्या माध्यमातून टास्क पूर्ण करण्याचे सांगून एका तरुणाला तीन लाख रुपयांना गंडा घातला. ही घटना शहरातील योगेशनगर भागात उघडकीस आली. या प्रकरणी महेशकुमार बन्सीदास भुगरे (३३) यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी होतेय फसवणूकअनोळखी क्रमांकावरून एका कंपनीकडून मोबाइलवर टेक्स्ट मेसेज येतो. वर्क फ्रॉम होमसाठी उमेदवार शोधत असल्याचे सांगून कंपनीचे टेलिग्राम चॅनल जाॅइन करण्यास सांगितले जाते. चॅनल जाॅइन केल्यानंतर एक टास्क दिला जातो. तो टास्क पूर्ण केल्यानंतर ट्रेडिंगसाठी इतर लोकांशी संपर्क करून टास्क देत पैशांची मागणी केली जाते. जास्तीचे पैसे आल्यानंतर लिंक बंद केली जाते, तर यू-ट्यूब व्हिडीओ लाइक केल्यास १५० रुपये मिळतील, असा मेसेज पाठवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे.

खबरदारी घ्यावीमागील काही दिवसांपासून सायबर भामट्यांकडून टास्क देऊन फसवणूक केली जात आहे. जिल्ह्यातील जवळपास सहाजणांना ३५ लाखांना गंडा घातला आहे. त्यामुळे नागरिकांनी आमिषाला बळी पडू नये. फसवणूक झाल्यानंतर तत्काळ सायबर पोलिसांना कळवावे.- संभाजी वडते, सहायक पाेलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

टॅग्स :Jalanaजालनाcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारी