शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले

By विजय मुंडे  | Updated: June 14, 2023 20:03 IST

जुना जालना भागातील रहिवासी असलेले अन्वर खान हे दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात.

जालना : दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढून वडिलांनी मुलीला शिक्षण दिले. वडिलांच्या कष्टाचे चीज करीत त्या मुलीने नीट परीक्षेत ७२० पैकी ६३३ गुण घेत डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकडे एक यशस्वी पाऊल टाकले आहे. कष्टकऱ्याच्या मुलीने मिळविलेल्या या यशाबद्दल तिच्यासह तिच्या वडिलांचे, कुटुंबाचे शहरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

जुना जालना भागातील रहिवासी असलेले अन्वर खान हे दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अडचणी येत असल्या तरी त्यांनी मुलगी मिस्बाह हिच्या शिक्षणासाठी सतत पाठिंबा दिला. शहरातील उर्दू ज्युनिअर कॉलेजमध्ये मिस्बाहचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. मिस्बाह हिने सातत्यपूर्ण अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के, तर १२ वीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळविले. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याची जाणीव असल्याने मिस्बाह हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेची तयारी सुरू केली. तिने सातत्याने अभ्यास करण्यावर भर दिला. यासाठी तिला उर्दू हायस्कूलचे प्रा. इफ्तेखार यांच्यासह अंकुश सरांचे मार्गदर्शन मिळाले. या परीक्षेचा बुधवारी निकाल जाहीर झाला आणि मिस्बाह हिने नीट परीक्षेत ७२० पैकी ६३३ गुण घेऊन घवघवीत यश संपादित केले. वडिलांनी पंक्चर काढत शिक्षणाला हातभार लावला आणि मिस्बाह हिने नीट परीक्षेत ६३३ गुण मिळविल्याने शहरात सर्वत्र या कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सर्वांच्या मार्गदर्शनाने यशडॉक्टर होण्याचे स्वप्न पाहून आपण सातत्यपूर्ण अभ्यास केला. आई-वडिलांसह कुटुंबातील सदस्यांचे मार्गदर्शन, सर्वच गुरुजनांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले आहे.मिस्बाह खान, विद्यार्थिनी

आनंदाची बाबपंक्चरचे दुकान चालवून मी कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मुलगी अभ्यासात हुशार असल्याने तिला सातत्याने पाठबळ देत गेलो. आज मुलीने नीट परीक्षेत यश मिळविले असून, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.- अन्वर खान, पालक

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालJalanaजालनाEducationशिक्षण