शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज- नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तथा प्रसिध्द करणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तथा प्रसिध्द करणे हा हेतू ठेवू नये, जेवढे आपल्या मुठीत बसते तेवढेच आपले असते, मुठीत बसण्यापेक्षा आपल्याकडे जास्त असल्यास ते इतरांना द्यावे, दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना देवाने चांगला पाऊस पाडून भरभरून द्यावे एवढेच आपण आकाशतील शक्तीकडे मागत असल्याचे सांगून नाना पाटेकर यांनी सर्वांना भावूक केले.निमित्त होते ते येथील भाईश्री फाऊंडेशनच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे. मंगळवारी दानकुंवरच्या मैदानावर नाम फाऊंडेशन आणि भाईश्री परिवाराकडून ४८ जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटात पार पडला. यावेळी प्रसिध्द कलावंत नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेष महाराज गोंदीकर यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी सांगिले की, समाजात अनेक प्रश्न, समस्या आहेत, ते सर्वांनी मिळून सोडवाच्या आहेत. त्यासाठीच आम्ही नाम फाऊंडेशनची स्थापना केली आहे. यातून आम्हाला मनस्वी आनंद मिळतो. गरिबांना दानशूर व्यक्तींकडून मोठी आशा असते, आणि येथे या सोहळ्यास भाईश्रींनी सांगितल्या प्रमाणे सर्व समाज घटकांनी मदत केल्याचे ऐकल्यावर मनाला खूप समाधान वाटल्याने पाटेकर म्हणाले.अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या खास शैलीत व्यासपीठावरील उपस्थित नव वधू-वरांनी त्यांच्या चेहºयावर हास्य आणावे, नंतर उद्यापासून तुमचे हास्य लोप पावेल असा सांगून गंभीर वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी राम..राम.. मंडळी अशी हाक देऊन दोन्ही हात जोडून उपस्थितांना अभिवादन केले.यावेळी नाम च्या माध्यमातून राज्यातील तीन हजार २०० सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाम फाऊंडेशनचा सहभाग असल्याचे सांगितले. सामूहिक विवाह चळवळ आता जोर धरू लागल्याचे समाधान व्यक्त केले. सोलापूर येथे एका मुलीच्या आई-वडिलांनी दहा हजार रूपये दिल्याची आठवण आपल्या मनात कोरल्याचे ते म्हणाले.मैत्र मांदियाळीस ११०० क्विंटल तांदूळया सामूहिक विवाह सोहळ्यात तांदळाच्या अक्षतां ऐवजी गुलाब पुष्पाच्या पाकळ्या देण्यात आल्या होत्या. अक्षतांसाठी लागणारा तांदूळ हा वाया जातो. तो वाया जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.ही बाब लक्षात घेऊन मैत्र मांदियाळीकडून ज्या गोरगरिबांना भोजन व्यवस्था केली जाते. त्यासाठी भाईश्री परिवाराकडून ११०० क्विंटल तांदूळ देण्यात आला. यावेळी मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे यांचा नाना पाटेकर यांनी सत्कार केला.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिकNana Patekarनाना पाटेकरMakrand Anaspureमकरंद अनासपुरे