शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

दर्जेदार खुराक पुरवण्यासाठी अनुदान वाढीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:56 IST

सध्या कुस्तीकडे पूर्वीप्रमाणे राजश्रय नसल्याने हा खेळ किमान महाराष्ट्रात तरी स्वत:च्या हिमतीवर कुस्ती टिकून आहे.

ठळक मुद्देदंगल, सुलतानने वाढवली कुस्तीची क्रेझजीममध्ये व्यायाम केल्याने कुस्ती खेळता येते असे नाही

- संजय देशमुख जालना : कुस्ती हा तसा अस्सल भारतीय खेळ , परंतु सध्या या कुस्तीकडे पूर्वीप्रमाणे राजश्रय नसल्याने हा खेळ किमान महाराष्ट्रात तरी स्वत:च्या हिमतीवर कुस्ती टिकून आहे. क्रिकेटला ज्या प्रमाणात देशात प्रसिध्द मिळाली त्या तुलनेने कुस्तीकडे पूर्वी पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नव्हते. मात्र दंगल आणि सुलतान या चित्रपटातून ज्या प्रमाणे कुस्तीला महत्व देण्यात आले, त्या नंतर मात्र परिस्थिती बदली असून, याखेळाकडे आता युवा पिढी आणि विशेष करून मुलींची संख्याही आता कुस्तीत लक्षणीयरित्या वाढल्याचे मोठे समाधान आहे. सरकार पातळीवरून अनुदान दिले जाते, मात्र ते अत्यंत तोकडे असल्याने त्यातून पहिलवान होणे दूरच राहते. त्यासाठी शासनाने खुराकासाठीच्या अनुदानात वाढ करणे अपेक्षित असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे निमित्त शिंदे तसेच कुस्तीगिर परीषदेचे अन्य पदाधिकारी जालन्यात दााखल झाले आहेत. कुस्तीच्या आखड्यावरच शिंदे यांच्याची बातचित करण्यात आली.

कुस्तीला अच्छे दिनसाठी काय केले पाहिजेकुस्ती हा भारतीयांचा जुना खेळ आहे. अस्सल भारतीय म्हणून या खेळाची ओळख आहे. परंतु हा खेळ म्हणजे व्यायाम आणि श्क्तीचा आहे. केवळ शक्ती असूनही यात चालत नाही. तर समोरचा कशी चाल करत आहे. किंवा तो कोणाता डाव टाकेल यावर लक्ष ठेवावे लागते. हे सर्व करण्यासाठी सुदृढ शरिर कमावण्यासाठी खुराक आणि अन्य पोषक आहाराची गरज असते. ही गरज आज सरकारकडून काही प्रमाणात पुरविली जात आहे. मात्र ते अनुदान तोकडे आहे. ते वाढवून दिल्यास चांगले कुस्तीपटू निर्माण होऊन कुस्तीला चांगले दिवस येऊ शकतात.

कुस्ती परिषदेचे ध्येय, धोरण कोणतीमहाराष्ट्र कुस्तीगिर परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा तसेच महापालिका क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या या संघटनेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या परिषदेची घोडदौड सुरू आहे. पुरूष, महिलांप्रमाणेच युवा खेळांडून प्रोत्सहान देऊन कुस्तीला एक तांत्रिक मान्यता कशी मिळेल याकडे आमचे लक्ष असते. या परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे हे यासाठी प्रशासकीय पातळीवर महत्वाची भूमिका निभावतात असेही शिंदे म्हणाले. कुमार आणि महिलांसाठी स्वतंत्र कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते.

मल्लांसाठी राखीव जागा गरजेच्याकुस्ती हा क्रीडा प्रकार एकास-एक असा आहे. त्यामुळे दोघांनाही प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची ठरते. ही प्रॅक्टिस करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा घेताना विशेषकरून सैन्य आणि पोलीस दलातील प्रश्नपत्रिका या वेगळ्या काढल्यास मल्लांना त्या सोडवितांना अडचणी येणार नाही. परंतु पोलीस आणि सैन्य दलात भरतीच्या वेळी आमचा पहिलवान सर्व बाबतीत सरस ठरतो. केवळ धावण्यासाठीचे जे निकष आहेत, ते पूर्ण करताना मल्लांकडून ते शक्य होत नसल्याने भरती होताना अडचणी येतात.

कुस्तीपटूसांठी परिषदेची कशी मदत होतेमहाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेकडून शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यातील चार नावाजलेल्या मल्लांना दर महिन्याला एक लाख रूपयांचे अनुदान दिले जात आहे. त्यात राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे यांच्यासह अन्य दोन जणांचा समावेश आहे.महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेत सहभागी मल्लांना सध्या केवळ सहभाग तसेच तो ज्या क्रमांने विजयी झाला ते प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येते. हे त्यांच्या भविष्यासाठी महत्वाची भूमिका निभावत असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच कुस्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम पंचाची नियुक्ती करण्यासाठी देखील वेगवेगळ्या पातळीवर परीक्षा घेतल्या जात असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदने महाराष्ट्रसह देशाला अनेक नामवंत पहिलवान दिले असून, त्याची यादी सांगयची म्हटल्यास ती खूप मोठी असल्याचे सांगून एक दैदिप्यमान इतिहास या परिषदेला असून, तेवढेच चांगले वर्तमान आणि उज्वल भविष्य असल्याचे सर्जेराव शिंदे यांनी नमूद केले.

टॅग्स :JalanaजालनाMaharashtra Kesriमहाराष्ट्र केसरीWrestlingकुस्ती