तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतपैकी तब्बल ३४ ग्रामपंचायत कार्यालयांवर राष्ट्रवादी, काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. उर्वरित २० ग्रामपंचायतींपैकी ८ शिवसेना, भाजपला एका ग्रामपंचायतमध्ये बहुमत मिळाले आहे.
आंतरवाली टेंभी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे महेश कोल्हे यांच्या पॅनलला १३ जागा मिळाल्या. रामसगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत भालेकर यांच्या पॅनलला ६ जागांवर बहुमत, राजेगाव येथे शिक्षण सभापती कल्याण सपाटे यांच्या पॅनलला राष्ट्रवादी- काँग्रेस नऊ जागा, रांजणी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी- काँग्रेसचे अमोल देशमुख यांच्या गटाला १५ जागा तर सेनेला दोन जागा मिळाल्या. खालापुरी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मरकड यांच्या गटाला ६ तर पानेवाडीचे राष्ट्रवादीचे राम सावंत यांच्या गटाला सहा, सेना- भाजप तीन, गुरु पिंपरी येथे राष्ट्रवादी सहा, भाजप तीन, बहिरेगाव येथे राष्ट्रवादी सहा, करडगाववाडीत राष्ट्रवादी सात, घोनसी खुर्द राष्ट्रवादी ५, शिवसेना ३, निपाणी पिंपळगाव राष्ट्रवादी चार, भाजप तीन, बोरगाव खुर्द राष्ट्रवादी ७, सेना दोन, जिरडगाव राष्ट्रवादी पाच, सेना दोन, यावल पिंपरी भाजपाच्या सात, यावल तांडा शिवसेना ९, रांजनीवाडी राष्ट्रवादी- काँग्रेस चार तर सेना तीन, माहेर जवळा महाविकास आघाडी ९, बोधलापुरी राष्ट्रवादी आठ, सेना १, बोडखा येथे महाविकास आघाडी आठ, गुंजमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस ९, अपक्ष एक सेना एक तर चित्रवडगावात लोकशाही पॅनलला पाच व इतर दोन, साकळगाव राष्ट्रवादी ९, लिंबोनी शिवसेना ७, घोंशी बुद्रुक सेना चार, राष्ट्रवादी ३, येवला सेना ३, राष्ट्रवादी ४, शिंदेवडगाव महाविकास आघाडी ७, स्वतंत्र सेना २, आवलगाव बुद्रुक राष्ट्रवादी ९, नागोबाचीवाडी सेना ७, राष्ट्रवादी २, खडका जयमंगल जाधव यांच्या पॅनलला ५, अहिलाजी बाबा ४, मुद्रेगाव सर्व पक्षीय ५, मांदळा राष्ट्रवादी ७, रवना राष्ट्रवादी ८ व इतर १, खापरदेव हिवरा राष्ट्रवादी ८, अपक्ष १, राहेरा राष्ट्रवादी पंडित धाडगे ४, विनायक धांडगे ३, करडगाव येथे आघाडी ४, राष्ट्रवादी स्वतंत्र ३, शिंदखेड राष्ट्रवादी ७, देवी दहेगाव सेनेच्या ९, कंडारी अंबड सेना ५, राष्ट्रवादी १, अपक्ष १, कंडारी परतुर राष्ट्रवादी ७, सेना २, मासेगाव राष्ट्रवादी ७, सेना दोन, देवडी हदगाव सेना ७, राष्ट्रवादी २, ढाकेफळ शिवसेना ९, सरब गव्हाण सेना सहा, राष्ट्रवादी तीन, खडकवाडी राष्ट्रवादी ४, नसीर गट ३, भायगव्हाण राष्ट्रवादी ६, इतर १, जोगलादेवी राष्ट्रवादी पाच, सेना २, जांब समर्थ राष्ट्रवादी ६, सेना ५, पारडगाव ग्रामपंचायतमध्ये चंद्रभूषण जयस्वाल यांच्या गटाचे ११, नजीर यांच्या गटाचे २, गुंज ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी ९, अपक्ष १ व सेनेचे उमेश काजळे व राष्ट्रवादीचे कैलास डोळस यांना सारखीच मते पडल्याने त्यांच्यात छापा- काटा होऊन सेनेचे उमेश काजळे यांचा विजय झाला. या ठिकाणी एससी प्रवर्गासाठी आरक्षण सुटलेले काजळे एकमेव सेनेचे सदस्य आहेत.