शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र उत्सवाची जिल्हाभर धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:28 IST

गणपती उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. रविवारी संपूर्ण जिल्ह्यात परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून नवरत्र उत्सवास प्रारंभ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणपती उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. रविवारी संपूर्ण जिल्ह्यात परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून नवरत्र उत्सवास प्रारंभ झाला. जालना शहरातही सकाळपासूनच सार्वजनिक दुर्गा मंडळांनी वाजतगाजत मूर्तीची मिरणूक काढून देवीच स्थापना केली. अंबड, सोमठाणा, मंठा पिंपळगाव रेणुकाई तसेच अन्य प्रसिद्ध देवी मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. या उत्सवानिमित्त ठिकठिकाणी मोठी यात्रा भरते. जालन्यातही दुर्गादेवी मंदिर, मंमादेवी मंदिर, काळुंका माता मंदिर, तुळजाभवानी मंदिरातही घटस्थापना करण्यात आली.परतीच्या पावसाने नवरात्र उत्सवाचा आनंद व्दिगुणित केला आहे. पिक परिस्थिती चांगली असल्याने शेतकरी देखील समाधानी आहेत. त्यातच आदीशक्तीचा उत्सव म्हणून या नवरात्र उत्सवाकडे पाहिले जाते. या काळा विविध देवींचे मंदिर-ठाणे येथे यात्रा भरतात. गणेश मंडळांप्रमाणे दुर्गा देवी बसविण्याची पध्दत आपल्याकडेही आता चांगलीच रूजली आहे. जालन्यातील विविध भागात युवकांनी आकर्षक विद्युत रोषणाई करून देवींची स्थापना केली आहे.यंदा दहा दिवस चालणाऱ्या उत्सवात मंदिरांमध्ये रविवारी सकाळी अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली.दररोज दुपारी आणि रात्री भजन, पूजन तसेच देवीचा गोंधळ घालण्याची पंरपरा आहे. अंबड येथील मत्स्योदरी देवी संस्थानमध्येही रविवारी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला.सकाळपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंठा येथील रेणुका देवी संस्थानमध्येही उत्सवास पंरपरागत पध्दतीने प्रारंभ झाला. बदनापूर जवळील सोमठाणा येथील मंदिरातही उत्सवास घटस्थापना करून सुरूवात करण्यात आली. जालन्यातील गांधी चमन येथील काळुंका माता मंदिर, मळ्यातील तुळजा भवानी मंदिरातही उत्सवास प्रारंभ झाला आहे.नवीन जालना भागातील दुर्गादेवीची मोठी यात्र दरवर्षी नवरात्रात भरते. या भागात रविवारी सायंकाळी पथदिवे बंद होते. तसेच या भागातून जाणा-या वाहतुकीचे नियोजनही कोलमडले होते. नवत्र उत्सवाची रविवारी पहिली माळ असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यातच महिलांची गर्दी ही लक्षणीय होती.या महत्त्वाच्या यात्रेकडे जिल्हाधिकारी तसेच जालना पालिकेने लक्ष देणे अपेक्षित होते असे अनेक भाविकांनी सांगितले. किमान पुढील नऊ दिवस तरी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून या भागातील पथदिवे तसेच वाहतूकची व्यवस्था स्वतंत्र करावी अशी मागणीही अनेकांनी केली आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रम