शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विरोधावर मात करत नारायण कुचेंची हॅट्ट्रिक; 'असा' मिळवला बदनापूरमधून भरघोस मतांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:08 IST

बदनापूरमधून बबलू चाैधरींचा पराभव; ४५ हजार ५३१ मतांनी नारायण कुचे यांचा विजय

बदनापूर : विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या दहा वर्षांत केलेली विकास कामे, जनसंपर्क व सक्षम प्रचार यंत्रणा याच्या जोरावर आमदार नारायण कुचे यांनी भरघोस मतांनी विजय प्राप्त करून या मतदारसंघात हॅट्ट्रिक साधली आहे.

बदनापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अनेकांनी यावेळी महायुतीचे नारायण कुचे व महाविकास आघाडीचे बबलू चौधरी यांच्यामध्ये रोमांचक लढत होईल, असे वाटले होते. परंतु पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आपले मताधिक्य कायम ठेवून महायुतीचे नारायण कुचे यांनी आपला विजय साकार केला. सकाळपासूनच कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक असलेल्या बदनापूर मतदारसंघात चुरशीची लढत दिसून आली. २०१४ व २०१९ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर नारायण कुचे २०१४ च्या निवडणुकीत विजयी होतील का, असा प्रश्न होता. परंतु, या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय खेचून आणला.

नारायण कुचे यांना काही गावांमध्ये विरोधाचा सामना देखील करावा लागला होता. मात्र, विरोधावर मात करत ते विजयी झाले. बदनापूर मतदारसंघात आठ अपक्ष उमेदवारांनी आजमावले होते. परंतु, मतदारांनी त्यांना फारसा काैल दिला नसल्याचे दिसून आले. या मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांना अधिक प्राधान्य दिल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.

विजयाची तीन कारणे१ नारायण कुचे यांनी गेल्या दहा वर्षांत जवळपास प्रत्येक गावात विकास कामे केलेली असल्याचे दिसून येते. यामुळेच त्यांना निवडणुकीत पुन्हा विजय मिळाला आहे.२ मतदारसंघातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली.३ निवडणुकीच्या काळात प्रत्येक गावात सक्षम प्रचार यंत्रणा राबविली.

पराभवाची कारणेनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचार यंत्रणा कमकुवत राबवली. पक्षफुटीमुळे गावागावात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कमतरता. महाविकास आघाडीतील आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचीय मोट बांधता आली नाही. शिवाय प्रचारादरम्यान प्रमुख मुद्दे प्रभावीपणे मांडता आलेले नाहीत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024badnapur-acबदनापूरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक