जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पिंपळगाव रेणुकाई यांच्या संयुक्त विद्यमाने माझं गाव सुंदर गाव या अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात ग्रामस्थांनी सहभागी होऊन गावातील सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळांची साफसफाई केली. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी गजानन पाखरे, ग्रामविकास अधिकारी पी. जी. सुरडकर, गणेश देशमुख, कडुबा देशमुख, पोलीस पाटील गणेश निकम, सरपंच पंचफुलाबाई बोर्डे, उपसरपंच चंद्रकलाबाई नरवाडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख, संदीप देशमुख, अमोल नरवाडे, राधाकिसन भोसले, भिकन देशमुख, संतोष बोर्डे, इरफान पटेल, निवृत्ती गावंडे, समाधान तायडे गावंडे, लक्ष्मण आहेर, कृष्णा बेराड, विजय देशमुख, ज्ञानेश्वर राऊत, प्रल्हाद साबळे आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
260221\26jan_7_26022021_15.jpg
===Caption===
पिपंळगाव रेणुकाई येथे जेसीबीच्या साहाय्याने घाण काढण्यात आली.