शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

‘त्या’ युवतीचा घराशेजारी राहणाऱ्या युवकाने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 01:26 IST

प्रेमप्रकरण समजल्याने बायको सोडून गेली आणि प्रियसीनेही लग्न केले. त्यामुळे संतप्त झालेल्या एका युवकाने तिला व एका युवकाला अद्दल घडविण्यासाठी ‘त्या’ युवतीचा खून केल्याचे चंदनझिरा पोलिसांच्या तपासात समोर आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रेमप्रकरण समजल्याने बायको सोडून गेली आणि प्रियसीनेही लग्न केले. त्यामुळे संतप्त झालेल्या एका युवकाने तिला व एका युवकाला अद्दल घडविण्यासाठी ‘त्या’ युवतीचा खून केल्याचे चंदनझिरा पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, आरोपीने त्या युवतीला आईस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने बोलावून घेत इंदेवाडी येथील मित्राच्या घरी नेऊन तिचा खून केल्याचेही समोर आले आहे.जालना शहरातील आयकर विभागाच्या कार्यालयामागील दरेगाव रोड असलेल्या रेल्वे पटरीवर २१ डिसेंबर रोजी दीपाली शेंडगे या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी प्रारंभी संशयित आरोपी अविनाश वंजारे (रा.परतूर) याला ताब्यात घेतले होते. मात्र, तपासाला दिशा मिळत नव्हती. त्या युवतीच्या घराशेजारी राहणारा सचिन गायकवाड याचे त्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते घटनेनंतर तो म्हाडा कॉलनी भागात दिसून आला नाही, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी तपास करून सचिन गायकवाड याला तांत्रिक पुराव्याच्या आधारे ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत सचिन गायकवाड याने आपणच दीपाली हिला आईस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले होते. त्यानंतर इंदेवाडी येथील एका मित्राच्या घरी कोणी नसल्याने तिला तेथे नेले.त्यावेळी दीपाली हिने ‘आता माझे लग्न झाले आहे. यानंतर मी तुला भेटणार नाही’ असे सांगून तिचे व अविनाश वंजारे यांनी लग्न करतानाचे फोटो दाखविले होते.तिच्यामुळे बायको एक वर्षापूर्वी सोडून गेली. तिने लग्न करून धोका दिल्याने राग अनावर झाल्याने तिचा खून करून आपणच बनाव केल्याची कबुली सचिन गायकवाड याने दिल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली.ही कामगिरी पोेलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शामसुंदर कौठाळे, फौजदार प्रमोद बोंडले, सुनील इंगळे, पोकॉ नंदलाल ठाकूर, कर्मचारी सतवण, अनिल काळे, अजय फोके, गोविंद पवार, महिला कर्मचारी श्रध्दा गायकवाड यांच्या पथकाने केली.स्वत:च टाईप केला मेसेजआरोपीने दीपालीचा खून केल्यानंतर रात्रीच्या सुमारास तिचा मृतदेह तिच्याच स्कूटीवर ओढणीने बांधून ठेवला. तिचा मृतदेह आयकर भवनाच्या पाठीमागे असलेल्या रेल्वे पटरीवर आणून टाकला.तेथे तिच्या मोबाईलवरून तिच्या संपर्क क्रमांकावर तिच्या लग्नाचे फोटो टाकले. तसेच सुसाईट नोटही टाईप करून टाकल्याची कबुली सचिन गायकवाड याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपीचाबनाव फसलाअविनाश वंजारे याच्या त्रासाला कंटाळून दीपाली हिने आत्महत्या केल्याचा सर्वांचा समज होईल आणि अविनाश याला शिक्षा होईल, असा कायास लावून आरोपीने बनाव रचला होता. मात्र, चंदनझिरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा छडा लावून आरोपी सचिन गायकवाड याचा बनाव उघडकीस आणला आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटकCrime Newsगुन्हेगारी