शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

वाशिम जिल्ह्यात खुन करुन मृतदेह फेकला जालन्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 18:47 IST

जालना पोलिसांनी ओडीसा येथील दोन आरोपींना मुद्देमालासह आज ताब्यात घेतले.

जालना :  चोरीच्या उद्देशाने वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील  ढाब्यावर दोघांनी एका व्यक्तीस मारहाण करुन त्याचा खुन केला. त्याचा मृतदेह  ट्रकमध्ये घेऊन जालना शहराजवळील खादगाव फाटा येथे फेकून एक लाख रुपयाचे लोखंडी पाईप चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसांनी ओडीसा येथील दोन आरोपींना मुद्देमालासह गुरुवारी ताब्यात घेतले. निरंजन ऊर्फ रंजान विजय प्रधान (२२. रा. बालीजेरंग  ता. अ‍ेस्कावली जिल्हा अंगुल, ओडीसा), रिलु मसरु चलान (२५. रा. सानसिंगारी ता. जि. संभलपुर, ओडीसा) असे आरोपींची नावे आहे.

जालना - औरंगाबाद रोडवरील खादगाव फाट्याजवळ १ मार्च रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना माहिती मिळाली की, हा खुन ओडीसा येथील आरोपींनी केला असून ते सध्या पुणे जिल्ह्यातील राजणगाव, चाकण, एमआयडीसी, सिक्रापुर या ठिकाणी आहे. या ठिकाणी त्यांचा शोध घेतला असता, ते दोघेंही येथे मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सदरील खुनाची कबुली दिली. दोघांना अटक करुन आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला ट्रक (क्रमांक ओडी. १५. जी. १६८६) आणि पाईप, पाईप विक्री करु न आलेल्या रक्कमेतून खरेदी केलेले नवीन मोबाईल अणि उवर्रित रक्कम असा एकूण १ लाख  रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आला. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, पोलीस नाईक सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, पो. कॉ. सचिन चौधरी, विलास चेके यांनी केली.

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिस