शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खून; दरोड्यांची उकल; कर्मचाऱ्यांचे ‘समाधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:33 IST

एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै अखेरपर्यंत खुनाच्या २३ पैकी २२ घटनांची उकल झाली आहे. तर दरोड्याच्या ८ घटनांपैकी सात घटनांचा तपास लागला

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासह गुन्ह्यांचा तपास वेळेत व्हावा, याकडे विशेष लक्ष दिले. एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै अखेरपर्यंत खुनाच्या २३ पैकी २२ घटनांची उकल झाली आहे. तर दरोड्याच्या ८ घटनांपैकी सात घटनांचा तपास लागला आहे. अधीक्षकांनी पोलीस मुख्यालयात सुरू केलेल्या समाधान कक्षात दाखल १४४ पैकी ११७ तक्रारींचा निपटारा झाला आहे.पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी गत वर्षी आॅगस्ट महिन्यात पोलीस दलाच्या कामकाजाची सूत्रे हाती घेतली. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरी, ग्रामीण भागात कोंबिंग आॅपरेशन, करून गस्तीत वाढ केली. तसेच इतर कारवाया ही करण्यात आल्या आहेत. विशेषत: राज्याचे लक्ष लागलेली जालना लोकसभेची निवडणूक शांततेत पार पाडण्यात पोलीस दलाला मोठे यश मिळाले. स्थानिक गुन्हे शाखा, एडीएस पथकासह ठाणेस्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखल विविध गुन्ह्यांची उकलही केली आहे. जुलै अखेरपर्यंत खुनाचे २३ गुन्हे दाखल होते. पैकी २२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. दरोड्याच्या ८ घटनांपैकी सात घटनांचा उलगडा झाला आहे. जबरी चोरीच्या ४९ पैकी २५ घटनांचा तर घरफोडीच्या १४२ घटनांपैकी २० घटनांचा उलगडा झाला आहे. इतर चो-यांच्या ५५१ घटना असून, २१७ प्रकरणांचा उलगडा झाला आहे.पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी इतरही विविध उपक्रम राबविले आहेत. पोलीस वसाहतीतील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नवीन बोअर घेतला असून, पाण्याच्या टाकीतून पाणी पुरविले जात आहे. पोलिसांची मुलं स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावेत, यासाठी स्पर्धा परीक्षेचीपुस्तके दिली आहेत. अधिका-यांच्या बदल्या एकाच वेळी करून पोस्टिंग दिले. विशेषत: सातव्या वेतन आयोगाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. कर्मचा-यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस मुख्यालयात सुरू केलेल्या समाधान कक्षात आॅनलाईन पध्दतीने ६६ तक्रारी दाखल झाल्या होत्या.यातील ५८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तर तक्रारदाराने कक्षात येऊन दिलेल्या ७८ तक्रारींपैकी ५९ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. इतर तक्रारींचा निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.उल्लेखनीय कामगिरीपोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षातील बहुतांश खून, दरोड्यांची उकल पोलिसांनी केली आहे. यात स्थानिक गुन्हे शाखेने परतूर, राजूर रोडवरील दरोड्यांच्या तपासाची केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. परतूर दरोड्यात मुंबई कनेक्शन समोर आले होते. खादगाव येथील ट्रक चालकाच्या खून प्रकरणाचा उलगडाही स्थागुशाने मोठ्या शिताफीने केला. इतर अनेक तपासही करण्यात आले आहेत.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाJalna Policeजालना पोलीसCrime Newsगुन्हेगारीMurderखूनRobberyचोरी