शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 19:06 IST

गाव शिवारात एका शेतात हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जालना : धारदार शस्त्राने वार करुन एका ४५ वर्षीय इसमाचा खून करण्यात आल्याची घटना जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथे बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सोमीनाथ शामराव जाधव (४५) असे मयताचे नाव आहे, अशी माहिती मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. विलास मोरे यांनी दिली.

जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथील सोमीनाथ शामराव जाधव हे मंगळवारपासून बेपत्ता होते. बुधवारी सकाळी एका शेतात त्यांचा मृतदेह काही ग्रामस्थांना दिसून आला. गाव शिवारात एका शेतात हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मौजपुरी पोलिसांना देण्यात आली. मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. मोरे यांच्यासह प्रशांत देशमुख व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सोमीनाथ जाधव यांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचे पोलिसांना दिसले. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाला अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी भेटी दिल्या.

शेतीचा वाद असण्याची शक्यता : दोघे ताब्यातसोमीनाथ जाधव यांचा खून हा शेतीच्या वादातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, पोलिसांनी गावातीलच दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचे मोरे म्हणाले.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना