शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

एकट्या राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धेचा घरात आढळला मृतदेह, तपासात खून झाल्याचे स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 17:05 IST

पार्वतीबाई यांना एक मुलगी आणि सावत्र मुलगा असून मुलगी सासरी तर मुलगा गावातच वेगळा राहतो.

- फकिरा देशमुखभोकरदन( जालना) : तालुक्यातील लिंगेवाडी येथील पार्वतीबाई रंगनाथ शिंदे या ८० वर्षीय महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी ( दि. १८ ) दुपारी 12 वाजता लिंगेवाडी येथील घरात पार्वतीबाई शिंदे या ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी पाहणी केली असता मृतदेहाच्या गळ्यावर काही खुणा आढळून आल्या. शवविच्छेदनाच्या अहवालातून वृद्ध महिलेचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सपोनि पोलिस रत्नदीप जोगदंड यांनी दिली.

व्याजाच्या व्यवहारातून खून? पार्वतीबाई यांना एक मुलगी आणि सावत्र मुलगा आहे. मुलगी औरंगाबाद येथे तर सावत्र मुलगा गावातच वेगळा राहतो. त्या घरी एकट्याच राहतात. त्यांचा खून कोणत्या कारणामुळे झाला याबाबत पोलिस तपास करत आहेत. मात्र, पार्वतीबाई यांचा खून व्याजाच्या पैशांच्या व्यवहारातून झाल्याची चर्चा गावात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना