शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका जालनेकरांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही - गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

नगरविकास मंत्री शिंदे हे शुक्रवारी जालना दौऱ्यावर होते; परंतु आ. कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ...

नगरविकास मंत्री शिंदे हे शुक्रवारी जालना दौऱ्यावर होते; परंतु आ. कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत हाेते. दरम्यान, त्यांना बैठकीतील महापालिकेसंदर्भातील चर्चेची माहिती मिळाल्यावर त्यांनी लोकमतशी संपर्क साधून आजच्या बैठकीतील महापालिकेसंदर्भातील निर्णयाला आपला प्रखर विरोध राहणार असल्याचे स्पष्ट केले, तसेच जर सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्यास त्याला आपण न्यायालयात आव्हान देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. महापालिका ही जालनेकरांसाठी कशी परवडणारी नाही, याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.

त्यात ते म्हणाले की, आज जालना पालिका ही अ वर्ग पालिका आहे. त्यामुळे जालना पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहायक अनुदानातून सरकार त्यांचे वेतन करते; परंतु महापालिका झाल्यास हेच वेतन महापालिकेला स्वत:च्या उत्पनातून करावे लागणार आहे. ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. यासह आज शहरातील विविध विकास कामांसाठी शासनाकडून जर शंभर कोटी रुपये मिळत असतील तर जालना पालिकेला त्याचा हिस्सा म्हणून केवळ २५ कोटी रुपयेच द्यावे लागतात; परंतु जर महापालिका झाल्यास हाच हिस्सा ५० कोटी रुपये भरावा लागणार असल्याचे ते म्हणाले. ही तर केवळ दोन ते तीन उदाहरणे आहेत, अन्य बाबतीतही पालिकेवर मोठा आर्थिक बोजा येणार आहे.

नागरिकांवरील कराचा बोजा वाढणार !

आज जालना पालिका असल्याने मालमत्ता तसेच नळपट्टी आणि बांधकाम परवानगीसाठी लागणारे कर हे महापालिकेच्या तुलनेने कमी आहेत. हेच कर महापालिका झाल्यास दोन ते तीन पटींनी वाढतील. त्यामुळे वरवर पाहता जालना पालिका झाल्यास त्याचा मोठा लाभ जालनेकरांना होईल, हे दिवासप्न आहे. त्यामुळे आपल्या म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या ताब्यात पालिका असल्याने आम्ही या पालिकेचे रूपांतर महापालिकेत करावे, असा ठराव कदपि देणार नाही.

आ. कैलास गोरंट्याल, जालना.