शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

मुंगडा.. मुंगडा... गाण्यावर केंद्रीयमंत्र्यांचा डान्स; बुलेट चालवत, खांदे उडवत दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 16:25 IST

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपल्या पत्नीसमेवत संबळ वाद्यावर डान्स केला होता

मुंबई/जालना - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या हटके शैलीमुळे आणि सर्वसाधारपणामुळे अनेकदा मीडियाचे लक्ष वेधून घेतात. कधी बैलागाडी चालवताना दिसतात, तर कधी जुन्या मित्रांसमवेत शेतात अंगत-पंगत जेवताना पाहायला मिळतात. त्यामुळे, त्यांच्या साधेपणाची नेहमीच चर्चा होत असते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी श्रमदान मोहिमेत सहभाग नोंदवून श्रमदान केले होते. यावेळी, स्वत: हाती कुऱ्हाड घेऊन स्वच्छता केल्याचं दिसून आला. आता, रावसाहेब दानवे यांनी भापजच्या बाईक रॅलीत सहभागी घेत बुलेट चालवली. तर, खांदे उडवत डान्सही केला. 

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपल्या पत्नीसमेवत संबळ वाद्यावर डान्स केला होता. आपल्या दिंडोरी मतदारसंघातील गावात पारंपरीक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी चक्क पत्नीला खांद्यावर उचलून घेतले, आणि डान्स केला. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलेटवर स्वार होऊन मुंगडा मुंगडा... या जुन्या व लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

मुंगडा... मुंगडा... गाण्यावर खांदे हलवत रावसाहेब दानवे यांनी बुलेटवर डान्स केला. जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये आज भाजपच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत दानवे यांनी बुलेट चालवत सहभाग घेतला. तसेच, रॅलीमध्ये डीजेवर मुंगडा ... मुंगडा... गाण्यावर खांदे हलवत डान्सही केला आहे. यावेळी दानवेंच्या मागच्या सीटवर भाजप आमदार नारायण कुचे यांनीही हात उंचावत प्रतिसाद दिला. सध्या दानवेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर, अनेकजण आपलं मत व्यक्त करत आहेत. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी हाती कुऱ्हाड घेवून घाणेवाडी (ता.जालना) येथील संत गाडगेबाबा जलाशयाच्या भिंतीवरील काटेरी झुडपे तोडली. या प्रकल्पाची भिंत स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून सुरू असलेल्या श्रमदान मोहिमेत रविवारी दानवे यांनी सहभाग नोंदवून श्रमदान करीत सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेMumbaiमुंबईJalanaजालनाBJPभाजपा