शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

बस-रिक्षाने प्रवास करणारे खासदार 'पीएचडी' अर्थात पुंडलिकराव हरी दानवे काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 18:08 IST

Pundalikrao Hari Danve: १९८९ ची  लोकसभा बरखास्त झाल्यानंतर त्यांनी खासदारांना मिळत असलेला रेल्वे सवलतीचा पास जमा करून दिल्ली ते औरंगाबाद असा सर्वसाधारण दर्जाच्या डब्यातून प्रवास केला होता.

- फकिरा देशमुख

भोकरदन ( जालना ) : औरंगाबाद-जालना लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिलेले पुंडलिक हरी दानवे ( Pundalikrao Hari Danve) ( ९५, रा. पिंपळगाव सुतार तालुका भोकरदन जिल्हा जालना)  यांचे सोमवारी सकाळी दहा वाजता औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.  त्यांच्यावर एक महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. पुंडलिकराव  हरी दानवे सर्वत्र पीएचडी या टोपण नावाने प्रसिद्ध होते. 

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे पुंडलिकराव दानवे यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला भारतीय जनसंघाच्या माध्यमातून सुरुवात केली. १९६७  झाली ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार या गावचे पंधरा वर्ष सरपंचपद भूषविले. त्यानंतर पंचायत समिती भोकरदन च्या निवडणुकीतही त्यांनी विजय संपादन केला. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवत विजय प्राप्त केला आणि पुन्हा मागे वळून पाहिले नाही. 

दोनवेळा राहिले खासदार जालना जिल्हा औरंगाबादमध्ये असताना त्यांनी काँग्रेसचे बाबुराव काळे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली. पाच वेळा जालना लोकसभा मतदार संघातून त्यांनी भारतीय जनसंघ व नंतर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यात त्यांना दोन वेळा यश आले. १९७७ मध्ये जनता दलाच्या लाटेमध्ये ते खासदार होते. त्यानंतर १९८९ मध्ये अल्प काळ राहिलेल्या लोकसभेचे सदस्यत्व भूषविण्याचा  मानही त्यांना मिळाला होता. १९८९ ची  लोकसभा बरखास्त झाल्यानंतर त्यांनी खासदारांना मिळत असलेला रेल्वे सवलतीचा पास जमा करून दिल्ली ते औरंगाबाद असा सर्वसाधारण दर्जाच्या डब्यातून प्रवास केला होता. व्ही.पी.सिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांना फोडण्याचा ही प्रयत्न झाला होता. परंतु, त्यांनी आपल्या निष्ठा भारतीय जनता पक्षासोबत कायम ठेवल्या होत्या. 

भाजपला सोडचिठ्ठी, राष्ट्रवादीत प्रवेश भोकरदन विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुलगा चंद्रकांत दानवे यांना भाजपाने उमेदवारी दिली नाही त्यावरून त्यांचे भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन, विद्यमान केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मतभेद झाले. यातून त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी दिली. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत चंद्रकांत दानवे निवडुन आले होते. त्यापूर्वी भाजपाने लोकसभा निवडणुकीत पुंडलिकराव दानवे यांच्या ऐवजी उत्तमसिंग पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सुध्दा त्यांनी भाजपा श्रेष्ठींवर गंभीरस्वरुपाची टीका केली होती.

सर्वपक्षीय नेत्यांशी होता जिव्हाळा मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची राजकीय ओळख होती. तसेच बस आणि रिक्षाने प्रवास करणारा खासदार म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. राजकारणात एवढ्या मोठ्या अत्युच्च पदावर राहूनही त्यांनी आपली साधेपणाची वर्तणूक कधीच बदलली नाही. भारतीय जनसंघाचे तत्कालीन नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख, कुशाभाऊ ठाकरे, सुंदर सिंह भंडारी, दत्तोपंत ठेंगडी, कर्नाटक केसरी जगन्नाथ जोशी, यादवराव जोशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबतही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. 

चार दिवसांपूर्वीच झाले होते पत्नीचे निधन पुंडलिकराव दानवे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नी केशरबाई दानवे (८६ ) यांचे २८ ऑक्टोंबर रोजी निधन झाले होते. त्यांच्यावर २९ ऑक्टोंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसातच पुंडलिकराव दानवे यांचेही निधन झाले. दानवे यांच्यावर त्यांच्या मूळगावी पिंपळगाव सुतार तालुका भोकरदन येथे मंगळवारी (दि. २) दुपारी साडेबारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा राष्ट्रवादी काँग्रेस भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, पिंपळगाव सुतार येथील माजी सरपंच बबनराव दानवे सुधाकर दानवे, कन्या जिजाबाई जाधव, जावई-सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

'शरद पवारांनी आदेश द्यावा, जालना लोकसभा लढवतो'; ९२ व्या वर्षी पुंडलिकराव दानवेंनी केली होती गर्जना

टॅग्स :JalanaजालनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारraosaheb danveरावसाहेब दानवे