शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चक्का जामच्या पार्श्वभूमीवर शहरातून मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:43 IST

मराठा आरक्षण आंदोलना नंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाने उचल खाल्ली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी युवकांनी मोटार सायकल रॅली काढली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा आरक्षणआंदोलना नंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाने उचल खाल्ली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या पाश्वभूमीवर रविवारी युवकांनी मोटार सायकल रॅली काढली होती.धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा ही गेल्या अनेक वर्षापासून समजाची मागणी आहे. असे असताना याकडे केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे.या संदर्भात १२ आॅगस्टची डेडलाईन सरकारला दिली होती. मात्र त्यावर काहीच निर्णय झाल्याने हे आंदोलन अटळ असल्याचे सकल धनगर समाजाच्यावतीने सांगण्यात आले.या आंदोलनानिमित्त रविवारी शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत चक्का जाम आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेऊन नियोजन करण्यात आल्याची माहिती एका निवेदनाव्दारे देण्यात आली. हा चक्का जाम आंदोलन शांततेच्या मार्गाने करून रूग्ण, वयोवृध्द व लहान मुलाची गैरसोय होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. या बंदसाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बैठक संपल्यानंतर शहरातील संभाजी उद्यान येथून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीचा समारोप शिवाजी महाराज पुतळ्या जवळ करण्यात आला.

टॅग्स :reservationआरक्षणagitationआंदोलन