शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री उदय सामंत, खासदार संदिपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; तिघांमध्ये तासभर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:57 IST

सरकारनं मागण्या मंजूर केल्या नाही तर राज्यव्यापी बैठक घेऊन

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज दुपारी शहागडजवळील पैठण फाटा येथील छत्रपती भवन  येथे भेट घेतली. यावेळी मंत्री सामंत, खासदार भुमरे व जरांगे पाटील यांच्यात तब्बल एक तास चर्चा झाली. 

येत्या 23 तारखेला जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मागच्या दोनवर्षांपासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मागचं उपोषण सोडताना सरकारनं जरांगे यांना आश्वासन दिलं होतं. आता आश्वासनाची मुदत संपत आहे. त्याआधी मंत्री सामंत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली.

...तर मुंबईत आंदोलन होणारकुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित कराव. सरकारला दिलेली मुदत 30 एप्रिलला संपत आहे. त्यामुळं सरकारनं मागण्या मंजूर केल्या नाही तर राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करू असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे. कुणीही नाराज माझ्या भेटीसाठी आला तरी समाजाच्या प्रश्नावरच चर्चा करणार मराठा समाजाचे तिनही गॅजेटियर लागू करा, कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेग द्या असेही जरांगे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे नाराज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली असून संजय राऊतांनी शिंदेंच्या कामाचं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. त्यांच्याकडे असलेले दहा पंधरा आमदार त्यांनी व्यवस्थित सांभाळावे, असा सल्ला दिला. तसेच त्यांच्यावर टीका करून आम्हाला संजय राऊत यांना मोठं करायचं नाही असे ही मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलUday Samantउदय सामंत