शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जाफराबाद तालुक्यातील पाचशे मच्छीमारांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 01:01 IST

धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे मच्छिमार कुटुंबांवरही स्थलांतराची वेळ आली असून, तालुक्यातील जवळपास पाचशे मच्छीमार स्थलांतरित झाले आहे.

प्रकाश मिरगे ।लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तालुक्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे मच्छिमार कुटुंबांवरही स्थलांतराची वेळ आली असून, तालुक्यातील जवळपास पाचशे मच्छीमार स्थलांतरित झाले आहे.तालुक्यातील सातही नद्यांना यावर्षी पाणी न आल्याने जिवरेखा, खडकपूर्णा या सारखी मोठी प्रकल्प कोरडीठाक पडली आहे.जाफराबाद शहरात भोई समाजाची मोठीवस्ती असून, त्यांचा पारंपरिक मच्छीमारीचा व्यवसाय आहे. ऐकाकाळी लहान - मोठे लघु तलाव, पूर्णा, धामणा, केळणा नदीला बारामाही पाणी राहायचे. त्यामुळे व्यवसायही चांगला होयचा. यावर्षी मात्र, पावसाने पाठ फिरवल्यामुळे मच्छिमार अडचणीत सापडले आहे. परिणामी, मच्छिमारी करणाऱ्या कुटुंबावर स्थलांतराची वेळ असून, कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी येथील मच्छिमार पुणे, बारामती, सोलापूर, नगर, उजनी, नाशिक आदी ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी स्थंलातरीत झाले असल्याची माहिती आहे.जाफराबाद तालुक्याला तसा निसर्गाचा कोप गेल्या तीन वर्षापासून जाणवत आहे. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ म्हणायची वेळ आली आहे. परिसरातील वाहून जाणारे पाणी इतर ठिकाणी जात आहेत.या ठिकाणचे मच्छीमार स्थलांतरितपावसाळ््याच्या सुरवातीला व्यवसाय करण्यासाठी मच्छीमारांनी अकोलादेव, कोनड, डोलखेडा, भारज या धरणात मत्स्य बीज सोडले होते. मात्र, पाऊस न आल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. जाफराबाद, कुंभारझरी येथील भोई कुटुंब, त्याचबरोबर मेरखेडा, निमखेडा येथील येथील भिल्ल समाज स्थलांतरित झाला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारwater shortageपाणीटंचाईMigrationस्थलांतरण