शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ऐरवी ५ लाख, आता फक्त ५० हजार! राज्यातील मनरेगा कामांवरील मजूर संख्या का घटली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:04 IST

हाताला काम मिळेना! 'एमएमएस' हजेरी आणि रोजंदारीच्या पेचामुळे मनरेगाचे मजूर संकटात;

- दीपक ढोले

जालना : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे हाताला काम मिळण्याची अपेक्षा असलेल्या मजुरांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. विविध मागण्यांसाठी काही ठिकाणी ग्रामरोजगार सेवकांचे सुरू असलेले काम बंद आंदोलन, वैयक्तिक कामांसाठी अनिवार्य केलेली एमएमएस हजेरी आणि आर्थिक वर्ष बदलाचा तांत्रिक फटका, यामुळे राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांवरील मजुरांची संख्या लक्षणीय घटली आहे.

सध्या ३४ जिल्ह्यांतील २८,३०७ पैकी २,३३२ ग्रामपंचायतींमध्ये ८,५९१ कामांवर केवळ ४९,६७३ मजूर उपस्थित असून, चार जिल्ह्यांत तर एकही मजूर कामावर नसल्याची माहिती समोर आली. यात अकोला, हिंगोली, बुलडाणा आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. तांत्रिक अडचणींचा सर्वाधिक फटका या जिल्ह्यांना बसला असून, मजूर हक्काच्या कामापासून वंचित राहत आहेत. राज्यात ऐरवी ४ ते ५ लाख मजूर दररोज उपस्थित असतात. मात्र, सध्या यात मोठी घट झाली आहे.

मजूर घटण्याची प्रमुख कारणे१. राज्य शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी रोजगार सहायकांना ८,००० रुपये मानधन आणि २,००० रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर केला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामरोजगारसेवकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

२. आता वैयक्तिक लाभाच्या कामांसाठीही 'एमएमएस'द्वारे हजेरी अनिवार्य केली आहे. त्याचे रजिस्ट्रेशन अद्याप पूर्ण झालेले नाही, परिणामी अनेक मजुरांची हजेरी लागणे कठीण झाले आहे.३. मार्चअखेर आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातीमुळे मस्टर निघणे आणि देयके मिळण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. मागील वर्षातील कामांचे पैसे पुढील वर्षात मिळणार असल्याने मजुरांत संभ्रमाचे वातावरण आहे.

जिल्ह्यांची मजूर उपस्थितीअहिल्यानगर ८२३, अकोला ०, अमरावती ६९०७, बीड ११८९, भंडारा १२२१, बुलडाणा ०, चंद्रपूर २१२५, छत्रपती संभाजीनगर ३०१, धाराशिव १०४४, धुळे १०२५, गडचिरोली २३२१, गोंदिया २२३१, हिंगोली ०, जळगाव १३००, जालना २२६५, कोल्हापूर २५७, लातूर १४७३, नागपूर २३८०, नांदेड १०९४, नंदूरबार ४६७४, नाशिक १३६७, पालघर ७७९४, परभणी ०, पुणे १०९७, रायगड ११७, रत्नागिरी २५७५, सांगली ७५, सातारा २०७७, सिंधूदुर्ग ३६२, सोलापूर १३४, ठाणे ५९९, वर्धा ३८०, वाशिम १५१, तर यवतमाळ जिल्ह्यात केवळ ३१५ मजूर उपस्थित आहेत.

अनेक कारणेसध्या वैयक्तिक कामांसाठी एमएमएस हजेरी लागू केली आहे. शिवाय, अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे मजुरांची संख्या घटली. याबाबत सोमवारी छत्रपती संभाजीनगरात आढावा बैठक होणार आहे.-भरत गोगावले, रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री.

२७ हजार ग्रामरोजगार सेवक संपावर३ ऑक्टोबर २०२४च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील २७ हजार ग्रामरोजगार सेवक संपावर आहेत. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात.-श्रावण बोकडे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना

English
हिंदी सारांश
Web Title : Why has the number of laborers decreased in MGNREGA works?

Web Summary : Maharashtra's MGNREGA sees a sharp decline in laborers due to delayed wages, MMS attendance, and gram sevak strikes. From lakhs to thousands, many districts report zero workers, impacting rural employment.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र