शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

२५ एकरांत साकारतेय स्मृती उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:50 IST

मोती तलावाच्यावरील बाजूस सर्वे क्रमांक ५०३-५०६ मध्ये पंचवीस एकरात नगरपालिकेच्यावतीने ‘स्मृती उद्यान ’ विकसित केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मोती तलावाच्यावरील बाजूस सर्वे क्रमांक ५०३-५०६ मध्ये पंचवीस एकरात नगरपालिकेच्यावतीने ‘स्मृती उद्यान ’ विकसित केले जात आहे. हे उद्यान जालनेकरांसाठी वरदान ठरणार आहे.शहरी भागातील वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावणाचा समतोल ढासाळत असून, याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांची संख्याही अधिक असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनस्तरावर वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून अटल अमृत योजनेतून शहरी भागात हरित क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जालना नगरपालिकेने शहरात हरित क्षेत्राचा विकास करण्याचा आराखडा तयार केला होता.या आराखड्यास अटल अमृत योजनेअंतर्गंत सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पैकी २४ लाख रुपये पालिका प्रशासनास प्राप्त झाले आहेत. प्राप्त निधीतून मोती तलावाच्यावरील बाजूस असलेल्या २५ एकर शासकीय जागेवर स्मृती उद्यान उभारण्याचे काम नगरपालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. उद्यानात झोन निहाय हरित पट्टे विकसित केले जाणार आहेत. रेल्वे रूळाला लागून असलेल्या या भागात सध्या वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम प्रगतीपथावर असून, उंच वृक्षही आणण्यात आले आहेत. आवश्यक तिथे जमिनीचे सपाटीकरण केले जात आहे. उद्यानाचा भाग मोती तलावाला लागूनच असल्याने येथील कामांसाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. दरेगाव वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांना या उद्यानामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या परिसरातील सर्व अतिक्रमणही काढण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.जालना : उद्यानात जालनेकरांसाठी असणार विविध सुविधाअहमदनगरच्या आर. एस. मांडे एजन्सीच्या माध्यमातून स्मृती उद्यान विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उद्यानाच्या संपूर्ण परिसराला तार कंपाऊंड करण्यात आले आहे. उद्यानात मोठी झाडे लावण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने मोठे खड्डे खोदण्याचे काम प्रगतीपथावर आहे. काळी माती व शेणखत टाकून खड्ड्यांमध्ये उंच झाडांची लागवड केली जाणार आहे. स्मृती उद्यानात लॉन्स, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी विशेष सुविधा असणार आहेत. तसेच फिरण्यास येणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्मृती उद्यान शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे ठरणार आहे.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरenvironmentवातावरणNatureनिसर्ग