शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

परतूर येथे शेतक-यांसोबतची  पालकमंत्री व जिल्हाधिका-यांची बैठक ठरली निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 18:40 IST

शेगाव-पंढरपूर महामार्गावरील परतूर तालुक्यातील शेतक-यांच्या जमिनी खरोखरच जात असतील तर मोजमाप करून त्यांना मावेजा देण्यात येईल, असे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतक-यांना दिले. मात्र, मावेजा मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा पावित्रा यावेळी शेतक-यांनी घेतल्याने पेच कायम राहीला. 

ठळक मुद्देशेतक-यांच्या खरच जमिनी गेल्या तर, मावेजा देवू - बबनराव लोणीकर    मावेजा मिळेपर्यंत काम बंद ठेवा शेतक-याची मागणी

परतूर : शेगाव-पंढरपूर महामार्गावरील परतूर तालुक्यातील शेतक-यांच्या जमिनी खरोखरच जात असतील तर मोजमाप करून त्यांना मावेजा देण्यात येईल, असे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतक-यांना दिले. मात्र, मावेजा मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा पावित्रा यावेळी शेतक-यांनी घेतल्याने पेच कायम राहीला. 

शेगाव- पंढरपूर मार्ग परतूर तालुक्यातून जात आहे. या रोडच्या रूंदीकरणात शेतक-यांच्या जमिनी जात असल्याचा आरोप श्रीष्टी, वाटूर, दैठणासह या मार्गावरील शेतक-यांनी करून या मार्गाचे कामही बंद पाडले होते. याबाबत शुक्रवारी तहसील कार्यालयात शेतक-यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

योग्य मोबदला देऊ पालकमंत्री लोणीकर म्हणाले, जमिनी पन्नास, शंभर वर्षापूर्वी रोडमध्ये गेल्या असतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याचा मोबदला देता येणार नाही. आज या शेगाव-पंढरपूर मार्गात जर शेतक-यांच्या मालकीची जमीन, झाडे, पाईपलाईन, पिकांचे नुकसान होत असेल तर संबंधीत विभागाचे अधिकारी मोजमाप करून शेतक-यांना मोबदला देण्यास शासन कटिबध्द आहे. मात्र, शेतकरी जर शासनाच्या हद्दीत अतिक्रमण करून मोबदला मागत असतील तर हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. तसेच तातडीने या जमीनचे मोजमाप करू, याची मोजणी शुल्कही शासन भरेल असेही लोणीकर यांनी सांगीतले. 

जमिनीचे मोजमाप अगोदर करायावेळी जिल्हाधीकारी शिवाजी जोंधळे म्हणाले, शेतक-यांच्या जमिनी जर मालकीच्या असतिल तर, त्या भुसंपादीत करू. हा रोड रस्ता शेतातून जात असल्याची खात्री करा, मगच काम थांबवा. प्रत्येक शेतक-यांसाठी पाईप टाकून पाईप लाईन शासनाच्या खर्चाने दुरूस्त करून देवू असे महामंडळाचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी सांगितले. शेतक-यांनी  रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी मोजमाप का केले नाही. यापूर्वीही संपादीत केलेल्या जमिनीचा मावेजा दिलेला नाही. आताही आमच्या जमिनी, शेत, झाड, पिक या रोडच्या कामात जात आहे. मात्र, मावेजा देण्या विषयी काहीच हालचाली नाहीत. त्यामुळे संपादीत करावयाच्या असलेल्या जमिनीचे मोजमाप अगोदर करा, मावेजा दया व नंतरच काम सुरू करा असा पावित्रा शेतक-यांनी घेतल्याने या बैठकीत पेच कायम राहीला. या बैठकिस जि. प. सदस्य राहुल लोणीकर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेस पाटील, तहसीलदार डी. डी. फुपाटे, शेतकरी बाळासाहेब अंभुरे, प्रशांत अंभुरे, रामराव अंभुरे, शिवदास गवळी, प्रकाश अंभुरे, प्रविण अंभुरे, शेख रहीम, धनंजय अंभूरे यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी