शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी बरसला; अनेक गावांच्या शिवारात गारपीट, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:11 IST

जालना शहरासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद व परिसरातील अनेक गावांमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद व परिसरातील अनेक गावांमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जालना तालुक्यातील कडवंची, अंबड तालुक्यातील शहागड, बदनापूर तालुक्यातील उज्जेनपुरी परिसरात गारपीठ झाल्याने रबी पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला आहे.जालना शहरासह जिल्हाभरात गत काही दिवसांपूर्वीही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसात काढून ठेवलेली पिके भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच उभे असलेल्या पिकांचेही वादळी वारे, पावसामुळे नुकसान झाले होते. काही गाव व परिसरातील पिकांच्या नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली होती. मात्र, भरपाई मिळेल की नाही ? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.या घटनेला काही दिवस लोटतात न लोटतात तोच मंगळवारी सायंकाळीही वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात हजेरी लावली.जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर, वडगाव व परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या गारपिटीत द्राक्ष बागांसह रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सरपंच चंद्रकांत पाटील, नंदापूर येथील नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले.जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, देळेगव्हाण परिसरातही गारपीट झाली. वादळी वा-यामुळे देळेगव्हाण परिसरातील झाडे उन्मळून पडल्याचे शेतकरी समाधान बनकर यांनी सांगितले. तर शेतातील शेडनेटचे जवळपास आठ लाखाचे नुकसान झाल्याचे कृष्णा सांगळे यांनी सांगितले.बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, उज्जैनपुरी, भराडखेडा, कंडारी, अकोला, निकळक, वाल्हा, शेलगावसह परिसरालाही पावसाचा फटका बसला. गारपिटीमुळे गव्हासह काढणीआलेल्या पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. रात्री उशिरापर्यंत शहरासह तालुक्याच्या विविध भागात परिसरातीही वादळी वा-यांसह विजा चमकून पावसाच्या सरी बरसत होत्या.दरम्यान, वादळी वा-यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीज गुल झाली होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.नुकसानभरपाई देण्याची मागणीजालना जिल्ह्यात गत काही दिवसांपूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. या पावसात रबी हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण भागात पुन्हा वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला.या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह द्राक्षबागा, आंबा व इतर फळपिकांना मोठा फटका बसला आहे. झाडे उन्मळून पडल्यानेही नुकसानीचा सामना शेतक-यांना करावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन्ही वेळेस झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी