शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 13:26 IST

सरकारचे एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तुमच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचं सांगत सरकारकडून जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय माघार नसल्याचे जरांगे यांनी जाहीर केल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज सरकारचे एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. परंतु सरकारने उद्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा, अन्यथा आमच्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करू, असा इशारा आता मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आला आहे.

"सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारला १२-१२ महिने लागतात का? मी सरकारसोबत चर्चा करण्यासाठी कायम तयार आहे. मात्र त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्यांचं शिष्टमंडळ येणार असल्याचं म्हणत आहेत, पण कधी येणार आहे ते माहीत नाही," असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

सरकारच्या शिष्टमंडळात कोणाचा समावेश?

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आज सरकारकडून पाठवण्यात येणाऱ्या शिष्टमंडळात मंत्री शंभूराज देसाई, तानाजी सावंत आणि राजेंद्र राऊत यांचा समावेश असू शकतो, अशी माहिती आहे. जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कशा प्रकारे काम सुरू आहे, याबाबतची माहिती सदर शिष्टमंडळाकडून दिली जाणार आहे. तसंच जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाणार आहे. या विनंतीला ते कसा प्रतिसाद देतात, हे पाहावं लागेल.

ओबीसी नेत्याला घेतलं ताब्यात

ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी येथे उपोषण करण्यास जात होते. ही माहिती पेालिसांना मिळाल्यानंतर हाके यांच्या लोकेशनची माहिती घेऊन त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, रात्रीतच हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले. हाके हे माढा लोकसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. यापूर्वी ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यात त्यांनी अतिशय प्रखरपणे आपली भूमिका मांडली होती. आता अंतरवाली सराटी इथं मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सावधानतेची भूमिका घेतली आणि हाके यांना ताब्यात घेऊन उपोषण न करण्याबाबत आवाहन केलं आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणShambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv Senaशिवसेना