शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तणावपूर्ण वातावरण, जमावाने चार बस पेटवल्या; अशी आहे परिस्थिती...

By विजय मुंडे  | Updated: September 1, 2023 22:24 IST

आंदोलकांची दगडफेक, पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह आंदोलकही जखमी

जालना: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषण करणाऱ्यांना उपचारासाठी नेण्याच्या कारणावरून शुक्रवारी दुपारी निर्माण झालेल्या वादातून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांचा लाठीचार्ज सुरू होताच आंदोलकांनी दगडफेक केली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत सतराहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वीसहून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त जमावाने चार बस पेटवून दिल्या असून, वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजबांधवांनी २९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर- सोलापूर महामार्गावर मोर्चा काढला होता. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाइलद्वारे आंदोलकांशी संवाद साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. शिवाय मराठा आरक्षणाच्या दृष्टीने शासन सकारात्मक पावले टाकत असल्याचे सांगितले होते. 

उपोषणकर्त्यांनी उपचार घ्यावेत, यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. शुक्रवारी दुपारीही मोठ्या फौजफाट्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांनी उपचार घ्यावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी प्रशासनाकडून जरांगे यांना उपचारासाठी नेण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यानंतर संतप्त आंदोलकांनीही दगडफेक सुरू केली. दगडफेक सुरू होताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर महामार्गावर चार बससह एक खासगी वाहन पेटवून दिले.

पोलिस अधिकारी, कर्मचारी, आंदोलक जखमीया घटनेत डीवायएसपी सचिन सांगळे यांच्यासह जवळपास अठराहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर अंबड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. अंतरवाली सराटी येथील दोन महिलांसह वीसहून अधिक आंदोलकही जखमी झाले असून, काहींवर वडीगोद्री येथील रुग्णालयात, तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

गोळीबार केल्याचा आरोपपोलिसांनी अचानक लाठीचार्ज करीत आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फाेडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. दगडफेक सुरू झाल्याने एकच धावपळ उडाली होती. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केल्याची चर्चा सुरू झाल्याने परिसरात आणखी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु पोलिस दलाच्या वतीने गोळीबार झाल्याचा आरोप फेटाळण्यात आला.

टॅग्स :JalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिस